21.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeSindhudurgनिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे वेतन देखील झेडपीएफएमएस प्रणालीद्वारे करण्याची मागणी

निवृत्त प्राथमिक शिक्षकांचे वेतन देखील झेडपीएफएमएस प्रणालीद्वारे करण्याची मागणी

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना त्यांचे मासिक वेतन देण्यासाठी झेडपीएफएमएस प्रणालीचा वापर केला जात असल्याने विनाविलंब शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होतो.

प्राथमिक शिक्षकांना त्यांचे निवृत्ती वेतन वेळेवर मिळण्याबाबत कायमच विविध कारणांनी विलंब होत असतो. सिंधुदुर्गातील निवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वेळेवर वेतन होण्यासाठी शासनाला एक निवेदन दिले आहे. कारण शासनाकडून सतत बँका बदलणे, अकाउंट अपडेट करणे, अनुदान वेळीच न येणे, वित्त विभागाने नवीन बदललेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यावर निवृत्ती वेतन जमा न करता पूर्वीच्याच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या खात्यावर जमा करणे अशा पद्धतीने काही न काही जिल्ह्याकडून तालुक्याला व तालुक्यातून संबंधित शिक्षकांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास विलंबच होतो आहे. त्यामुळे निवृत्ती वेतनधारक देखील आर्थिक अडचणीत सापडत आहेत. या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आले.

सध्या प्राथमिक शिक्षकांना त्यांचे मासिक वेतन वेळेत मिळण्यासाठी झेडपीएफएमएस प्रणालीचा वापर केला जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना त्यांचे मासिक वेतन देण्यासाठी झेडपीएफएमएस प्रणालीचा वापर केला जात असल्याने विनाविलंब शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होतो. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांचे मासिक निवृत्ती वेतन व अन्य रकमा वेळेत मिळण्यासाठी त्यांचे निवृत्ती वेतन व अन्य रकमा जिल्ह्याकडून याच प्रणालीद्वारे संबंधितांच्या खातेपुस्तकात जमा करावेत, अशी मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे जिल्हा शिक्षक प्रतिनिधींनी निवेदनाद्वारे केली आहे.

या प्रणालीनुसार जिल्ह्याकडूनच एका क्लिकमध्ये जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे वेतन तत्काळ त्यांच्या ठराविक खात्यामध्ये क्षणार्धात जमा होते. सेवानिवृत्त शिक्षकांच्या देय निवृत्ती वेतन व अन्य रकमा जिल्ह्याकडूनच या प्रणालीद्वारे संबंधित निवृत्त शिक्षकांच्या खातेपुस्तकात जमा कराव्यात, अशी मागणी केली आहे. ही कार्यवाही त्वरित सुरू झाल्यास निवृत्ती वेतनासाठी होणारा वेळ काही प्रमाणात कमी होऊ शकतो, अशी माहिती सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, प्रभाकर ढवळ, सोनू नाईक यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular