31.4 C
Ratnagiri
Friday, March 14, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeMaharashtraशेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा

शेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासाजनक निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. जे शेतकरी पिककर्जाची नियमित परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना ३ लाख रुपयां पर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केली आहे.

या निर्णयानुसार आता अल्पमुदत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत ३ लाख रुपये मर्यादेपर्यंतच्या कर्जावर ३% व्याज सवलत मिळेल आणि केंद्र शासनामार्फतही ३ लाख रुपये कर्ज अल्पमुदत पीककर्जावर मुदतीमध्ये परतफेड केल्यास ३% व्याज सवलत मिळणार आहे.  त्यामुळे २०२१-२२ सालापासून शेतकऱ्यांना ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत्तीच्या कर्जाची ठराविक मुदतीमध्ये परतफेड केल्यास त्यांना एकूण ६% व्याजसवलत मिळणार असून, त्यांना सदरचे पीक कर्ज  एकूण शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना विविध पर्यायी उपक्रमसुद्धा राबविता येऊन उत्पन्न वाढीकडे लक्ष पूरविता येणार आहे. तसेच शेतीसाठी अत्यावश्यक असणारे आधुनिक बी-बियाणे, रासायनिक तसेच सेंद्रिय खते, फवारणी साठी औषधे खरेदी करतान हाथ आखडता घ्यावा लागणार नाही आहे. उत्कृष्ट बियाणे आणि खतांचा वापर केल्याने यातून मिळणारे उत्पन्नाचा दर्जाही चांगला असल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत होऊ शकते. तसेच घेतलेल्या कर्जाची सवलत मिळण्यासाठी ठराविक वेळेत परतफेड केल्याने, बँकांच्या सुद्धा आर्थिक धोरणाध्ये वाढ होण्यास मदत होईल.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या दिलासाजनक निर्णयाबाबत बोलताना सांगितले की,  याआधी शेतकर्यांना १ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जात होते आणि त्यावर ३ लाखापर्यंत कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना ३% व्याज भरावे लागत असे. परंतु, आता ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याने राज्यातील ४५ लाख शेतकऱ्याना याचा लाभ होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular