26 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriखेळाडूंनी ऑल राऊंडर व्हावे, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

खेळाडूंनी ऑल राऊंडर व्हावे, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

कोरोनाच्या गेल्या दोन वर्षाच्या काळानंतर अशा प्रकारची ही मोठी स्पर्धा रत्नागिरीत घेण्यात आली आहे.

रत्नागिरीतील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनकडून या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. ३७ व्या किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचा शुभारंभ रविवारी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले.

कोरोनाच्या गेल्या दोन वर्षाच्या काळानंतर अशा प्रकारची ही मोठी स्पर्धा रत्नागिरीत घेण्यात आली आहे. रत्नागिरी मध्ये विविध खेळ प्रकारामध्ये अव्वल कामगिरी करणारे अनेक खेळाडू आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी देवेंदर सिंग, सीईओ कीर्तीकुमार पुजार, भारतीय खो-खो संघटनेचे सहसचिव डॉ. इंद्रजित जाधव, राज्य खो-खो असोसिएशनचे माजी सचिव संदीप तावडे, तसेच राजेंद्र चव्हाण, महाराष्ट्र खो-खो सहसचिव गोविंद शर्मा, जिल्हा खो-खो असोशिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ बाळू साळवी,  यांच्यासह राज्य खो खो असोसिएशनचे राज्यभरातून आलेले पदाधिकारी आणि रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी यांची प्रमूख उपस्थिती होती.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर खो-खो ची तीन मैदानांवर सामने खेळवले जात आहेत. जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी खेळाडूंना उद्देशून प्रतिपादन केलं कि, केवळ स्थानिक, राज्य पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चांगले यश मिळवा. खेळाडूंनी ऑल राऊंडर व्हावे, असे म्हणून खेळासाठी उत्साह वाढवून शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular