26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्यात ३०२ गावांमध्ये, स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार

रत्नागिरी जिल्ह्यात ३०२ गावांमध्ये, स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार

रत्नागिरी जिल्ह्यात ३०२ गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत

राज्यात स्कायमेटच्या महावेध प्रकल्पांतर्गत पावसाची अचूक नोंद घेण्यासाठी अतिरिक्त हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ३०२ गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यामुळे, राज्यात सध्या २१२७ हवामान केंद्रे उभारलेली आहेत. ही संख्या मर्यादित असल्यामुळे हवामान केंद्रांची संख्या वाढवणे आवश्यक आहे.

शासन स्कायमेटच्या महावेध प्रकल्पांतर्गत हवामानाची माहिती घेते. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार राज्यांमध्ये १० हजार स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी हवामान विभागाच्या निकषानुसार, ग्रामपंचायतीकडून जागांचा शोध सुरू करण्यात आला आहे. याबाबत कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवले असून, स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड करून त्यांच्या हद्दीत केंद्र उभारली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. हवामान केंद्र उभारण्यात आल्यामुळे पावसाची अचूक नोंद घेता येणार आहे. या द्वारे शेतीच्या होणाऱ्या नुकसानीचा अंदाज बांधता येतो. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना परतावा मिळणे सोपे होईल.

त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने केंद्रे उभी करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देण्याबाबत कृषी आयुक्तांनी आदेश दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात हवामान केंद्र उभारणीचे उद्दिष्ट्य निश्चित केले आहे. जी ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल तेथे स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जणार आहे. या द्वारे पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, यायची दिशा, वाऱ्याचा वेग आदी प्राप्त होणाऱ्या हवामानविषयक माहिती उपलब्ध करून पिकविमा योजना, हवामान आधारित फळपिक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन कार्य, आपत्ती व्यवस्थापन या प्रकारच्या विविध उपक्रमांसाठी यासाठी या माहितीचा वापर होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular