24.1 C
Ratnagiri
Tuesday, January 13, 2026

खेड मतदार संघाची होणार लवकरच पुनर्रचना शिवसेना नेते रामदास कदम

२००९ पासून विभागलेला खेड मतदारसंघ पुन्हा पुनर्रचीत...

रत्नागिरी शहरात क्रांतीनगर येथे कचरा डेपोत सापडले नवजात जिवंत अर्भक

रत्नागिरी शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला...

रत्नागिरीत जाकादेवी परिसरात बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथे एका विहिरीत...
HomeRatnagiriरत्नागिरीत मच्छिमारी करून परतणारी बोट उलटली

रत्नागिरीत मच्छिमारी करून परतणारी बोट उलटली

एकाचा मृतदेह सोमवारी पांढरा समुद्रकिनारी सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

शहराजवळील कर्ला येथील अमिना आयशा नावाची होडी मिरकरवाडा बंदरातून वायंगणी भागात मासेमारीसाठी गेली होती. मासेमारी करून ही होडी रविवारी सायंकाळच्या सुमारास परतत असताना भगवती किल्ला येथे उसळणाऱ्या लाटांच्यौ तडाख्यात सापडली. पाण्याला मोठ्या प्रमाणावर करंट असल्याने ही होडी समुद्रात बुडाली. यावेळी या होडीवर ८ खलाशी होते. बोट बुडाल्यानंतर होडीतील खलाशांनी तासभर पोहत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथूनच येणाऱ्या एका दुसऱ्या मासेमारी नौकेने ६ खलाशांना वाचविले. तर दोन पागी समुद्राच्या पाण्यात् बेपत्ता झाले. त्यातील एकाचा मृतदेह सोमवारी पांढरा समुद्रकिनारी सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. पोलीसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी ७ वा. च्या सुमारास घडली.

अधिक वृत्त असे की, शब्बीर अल्लीसाब मजगावकर (रा. कर्ला, रत्नागिरी) यांची अमिना आयशा बोट रविवारी दुपारी ४.३० वा. च्या सुमारास मिरकरबाडा बंदरातून वायंगणी समुद्राच्या पाण्यात मासेमारीसाठी गेली होती. या बोटीवर शब्बीर मजगावकर यांच्यासह तांडेल अब्दुल रशिद अलिसाहेब मजगांवकर (वय ३५, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी), फैज अब्दूलमजीद बुडीये (वय ३९, रा. कर्ला, रत्नागिरी) इम्तीयाज मिरकर (३६ रा. राजिवडा, रत्नागिरी), विनोद हिरु धुरी (वय ६३, रा. मांडवी बंदर रोड, रत्नागिरी), रबिजोल इस्लाम चौधरी (वय २१, रा. मुळ आसाम), जियाउद्दीन लष्कर (वय २०, मुळ आसाम), एनामुद्दीन हसन (वय २४, मुळ आसाम) हे होते. हे सर्वजण मिळून अमिना-आयशा बोटीतून मच्छीमारी करण्यासाठी वायंगणी बाजूच्या दिशेने मासे पकडण्यासाठी समुद्रात बोट घेवून गेले होते.

परतताना अपघात – मासे पकडून झाल्यानंतर सर्वजण मिरकरवाडा जेटी येथे परत येत असताना सायंकाळी ६ वा. च्या सुमारास भगवती किल्ला जवळील ब्रेकवॉटरच्या टोकावर आल्यावर समुद्रातील पाण्याची एक मोठी लाट आल्याने त्या लाटेवरुन अमिना आयशा बोट उलटली. सायंकाळी ७ वा. च्या सुमारास ही दुर्घटना घडली. बोट उलटल्यानंतर बोटीवरील ८ खलाशांनी जीव वाचविण्यासाठी समुद्राच्या पाण्याल उड्या घेतल्या, पोहण्यास सुरवात केली. बोट पाण्याखाली जात असताना खलाशांनी आरडा-ओरडा केला. त्यावेळी समुद्रात असलेल्या एका बोटीने ६ जणांना आपल्या बोटीवर घेतले. त्यामुळे ते वाचले. पण यामध्ये दोन पागी विनोद धुरी व एनामुद्दीन हसन हे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता असल्याची माहिती उर्वरित पागींनी दिली. त्यांचा शोध सुरू झाला.

एकाचा मृतदेह सापडला – या प्रकरणी अमिना-आयशा बोटीचे मालक शब्बीर अल्लीसाब मजगावकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिस बेपत्ता पागींचा शोध घेत असताना सोमवारी (ता. १ सप्टेंबर) दुपारी पांढरा सुमद्र येथे विनोद धुरी यांचा मृतदेह सापडला. मात्र पागी एनामुद्दीन हसन अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular