26.6 C
Ratnagiri
Tuesday, January 27, 2026

जिल्ह्यात गुप्त बैठकांचा जोरात धडाका उमेदवारांची पडताळणी, रणनीतीला वेग

जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच...

अपघाती जखमींना ‘कॅशलेस’ उपचार, मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार !

रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या...

अर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
HomeKhedलोटे डिव्हाईन केमिकल कंपनीत स्फोट, ८ जण होरपळले

लोटे डिव्हाईन केमिकल कंपनीत स्फोट, ८ जण होरपळले

प्राथमिक माहितीमध्ये कंपनीतील सॉलवंट केमिकलने पेट घेतल्याने हा अपघात झाल्याची मिळत आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील डिव्हाईन केमिकल कंपनीत रविवारी ता. १३ रोजी सकाळी साडेदहा वाजता भीषण स्फोट झाला. यामध्ये कंपनीतील आठ कामगार होरपळले असून, गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सुरुवातीला उपचारासाठी चिपळूणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मुंबईत हलवण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीमध्ये कंपनीतील सॉलवंट केमिकलने पेट घेतल्याने हा अपघात झाल्याची मिळत आहे. लोटे एमआयडीसीमध्ये डिव्हाईन केमिकल ही रासायनिक कंपनी २००७ पासून कार्यरत आहे. कंपनीत आज सकाळी वेल्डिंगचे काम सुरू होते. कंपनीतील ड्रममध्ये सॉलवंट केमिकल भरलेले होते. हे ड्रम सलग रांगेत लावून ठेवले होते. यातील सात फुटले आणि सात कामगार जखमी झाले. वेल्डिंगचे काम सुरू असताना, अचानक आगीची ठिणगी रसायन भरलेल्या एका ड्रममध्ये पडल्याने स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

स्फोटाचा आवाज येताच कंपनीतील कामगारांची धावाधाव सुरू झाली. बाकीच्या रसायन भरलेल्या ड्रममध्ये स्फोट होऊ नये म्हणून कामगारांनी शर्थीचे प्रयत्न केले. रात्रपाळीचे कामगार ड्युटी संपवून सकाळी घरी जातात आणि सकाळी नऊनंतर कामगारांची पहिली शिफ्ट सुरू होते. याचदरम्यान हा अपघात झाला. अपघातामध्ये सतीशचंद मुकुंदचंद मोर्या, दिलीप दत्ताराम शिंदे, विनय मोर्या, दीपक गंगाराम महाडिक, मयूर खाके, आदिश मोर्या, संदीप गुप्ता, बिपिन मंदार हे आठ कामगार गंभीरित्या भाजले आहेत. यातील सतीशचंद मोर्या, दिलीप शिंदे, विनय मोर्या, दीपक महाडिक व मयूर खाके यांना चिपळुणातील एका हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लोटे पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता अरविंद पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कंपनीतील कामगार व ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

RELATED ARTICLES

Most Popular