26.1 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

गणेशोत्सव कालावधीत रेल्वेप्रवासात मिळणार आता उकडीचे मोदक

गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारत आणि...

पुनर्वसन वसाहत की, कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत...

महाविकास आघाडीचा महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

दिवसात अनेकवेळा लाईट जात आहे.... तरीपण अवाच्यासवा...
HomeKhedखेड तालुक्यात कोरोना लसीकरणाची मोहीम थंडावली

खेड तालुक्यात कोरोना लसीकरणाची मोहीम थंडावली

खेड तालुक्यातही १५ ते १८ वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणाची मोहीम बऱ्याच प्रमाणात थंडावली आहे.

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचे लसीकरण आता बऱ्याच प्रमाणात थंडावली आहे. विविध वयोगटातील लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींसाठी लसीकरणाची मोहीम राबवली गेली होती. कोरोनाच्या वाढत्या संकटानंतर लहान मुलांच्या लसीकरणास प्रारंभ होताच लसीकरण मोहिमेने वेग घेतला होता. परंतु, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर लसीकरणाची आकडेवारी हळूहळू कमी होऊ लागली. खेड तालुक्यातही १५ ते १८ वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणाची मोहीम बऱ्याच प्रमाणात थंडावली आहे.

गेल्या १० दिवसांत एकाही मुलाने कोरोनाचा डोस घेतला नसल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर कोरोना डोस घेण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. कोविशिल्डच्या पहिल्या डोसचे आतापर्यंत ९२ हजार ५३६ तर दुसऱ्या डोसचे ८१ हजार ४८३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोवॅक्सिनच्या पहिल्या डोसचे २५ हजार ४०७ तर दुसऱ्या डोसचे २२ हजार ४७९ जणांचे लसीकरण झाले आहे.

तालुक्यात बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांचाही २० हजाराचा टप्पा पार झाला असून ही संख्या २० हजार ११७ वर पोहचली आहे. अजूनही काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत असून, १५ ते १८ वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणाची आकडेवारी गेल्या १० दिवसात कमी झाल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका हद्दीत २६९६, तळे विभागात ११२१, कोरेगाव- १३१९, फुरुस- २७९४, आंबवली- २२५९, वावे- ५५९, लोटे- १४४०, शिवबुद्रुक- २५१६, तिसंगी- ७४९, तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयांतर्गत ४१ मुलांचे लसीकरण झाले आहे. १२ ते १४ वयोगटातील ७११८ मुलांचे लसीकरण झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular