26 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

एसटी प्रशासनाकडून लोकेशन अॅप’ची केवळ घोषणा

लालपरी'चे अचूक ठिकाण मोबाईलवर दिसेल, बस वेळेवर...

पीकविमा योजनेत खेड-दापोली आघाडीवर…

प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी...

परतीचा प्रवास ठरला कोंडीचा… वाहनांच्या रांगा

गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बुधवारपासून सुरू...
HomeDapoliएटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या पैशाचा अपहार, चौकशी सुरु

एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या पैशाचा अपहार, चौकशी सुरु

रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, डोंबिवली या कंपनीकडे खेड व दापोली येथील बँकांच्या एटीएममध्ये कॅश भरण्याचे काम करतात.

दापोलीमध्ये बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेले ५५ लाख ५० हजार रुपयांची रोकड एटीएममध्ये लोड न करता तिचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोन संशयितावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमोल नाचरे व प्रथमेश शिर्के यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, डोंबिवली या कंपनीकडे खेड व दापोली येथील बँकांच्या एटीएममध्ये कॅश भरण्याचे काम करतात. या कंपनीचे ऑपरेटर अमोल अशोक नाचरे रा. उंबर्ले, ता. दापोली व प्रथमेश विश्वनाथ शिर्के रा. तळे, ता. खेड हे कर्मचारी आहेत, बँकेमधून कॅश घेऊन पैसे घेऊन ती एटीएम मशिनमध्ये लोडिंग करण्याचे काम हे दोघे कंपनीच्या वतीने दापोली व खेड विभागकरता करत होते.

ही रक्कम येथील बँकेकडून ताब्यात घेऊन ती एटीएममध्ये लोड करायचे अत्यंत जबाबदरीचे व जोखमीचे काम या दोघांकडे देण्यात आले होते. मात्र, या दोघांनीही तब्बल ५५ लाख ५० हजार इतकी मोठी रक्कम ताब्यात घेऊन ती एटीएममध्ये लोडिंग केली नाही. त्यामुळे या रक्कमेचे नेमके काय झाले या सगळ्या प्रकरणाची आता पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आहे.

११-१५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये अ‍ॅक्सिस बँकेच्या ३ व स्टेट बँकेच्या २ एटीएममध्ये भरण्यासाठी त्यांच्या कंपनीने दिलेले ५५ लाख ५० हजार रुपये त्यांनी एटीएममध्ये न भरता या रकमेचा अपहार केल्याची तक्रार कंपनीचे शाखा व्यवस्थापक देवेंद्र चुडे रा. घणसोली, नवी मुंबई यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular