23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKhedलोटे कंपनीमधील स्फोटामध्ये मृतांच्या संख्येत वाढ

लोटे कंपनीमधील स्फोटामध्ये मृतांच्या संख्येत वाढ

लोटे औद्योगिक वसाहतीतील डिव्हाईन कंपनीत झालेल्या स्पोटाच्या दुर्घटनेप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) आक्रमक झाली आहे.

लोटे येथील डिव्हाईन केमिकल्स कंपनीमधील स्फोटामध्ये भाजलेल्या आठ कामगारांपैकी संदीप गुप्ता पाठोपाठ शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री विपल्य मंडल या भाजलेल्या कामगाराचा मुंबई येथील ऐरोली नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान इतके दिवस होऊनही कंपनी प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. डिव्हाईन कंपनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील डिव्हाईन कंपनीत झालेल्या स्पोटाच्या दुर्घटनेप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) आक्रमक झाली आहे. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कामगारांसह जखमी कामगारांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा रिपाईचे कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ यांनी दिला आहे.

या स्फोटात आज आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर रिपाईचे कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातील पदाधीकाऱ्यानी दुर्घटनाग्रस्त कंपनीला भेट दिली. या भेटी दरम्यान मृत व जखमी कामगारांना न्याय देण्यासाठी रिपाईने पुढाकार घेतला आहे. मृत कामगारांसह जखमी कामगारांना जोपर्यंत योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही, असा इशारा सकपाळ यांनी दिला आहे. मृत व जखमी कामगारांना तातडीने मदत देण्याची मागणी करत ही बाब गांभर्याने न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही सकपाळ यांनी दिला आहे.

या दुर्घटनेतील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. अन्य सहा कामगार मृत्यूशी झुंज देत आहेत. डिव्हाईन केमिकलमध्ये रविवारी दि. १३ रोजी सकाळी झालेल्या स्फोटानंतर आठ कामगार होरपळले होते. त्यापैकी संदीप गुप्ता याचा दि. १४ रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. तर त्या पाठोपाठ त्याच रुग्णालयात विपल्य मंडल या आणखी एका कामगाराचा शुक्रवारी दि. १८ रोजी मृत्यू झाल्यामुळे या घटनेला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

या सगळ्या प्रकरणी आता खेड पोलिसांनी या घटनेची चौकशी करून डिव्हाईन कंपनी प्रशासनावर कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. अशा दुर्घटना गेल्या वर्षेभरात लोटे एमआयडीसीमध्ये अनेकदा घडून आल्याने परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular