29.4 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

शृंगारपूरमधील दोन घरांमध्ये बिबट्या घुसला…

साऱ्या जिल्ह्यात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु झाला आहे....

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...
HomeRatnagiriशालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर..... - आमदार राजन साळवी

शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर….. – आमदार राजन साळवी

शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी तुमच्या पाठीशी कायम राहील, असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी लांजा येथे व्यक्त केला.

शिवसेनेचे माजी तालुका संपर्कप्रमुख व मुंबई विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव कै. काकासाहेब सरफरे स्मृती एसएससी व्याख्यानमाला व लांजा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या लांजा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच झाला. न्यू इंग्लिश स्कूल लांजाच्या सभागृहात हा सोहळा झाला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजन साळवी बोलत होते.

प्रामाणिक प्रयत्न केले की, यश हे नक्कीच मिळते म्हणून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर कोकणातून देखील उच्चपदस्य अधिकारी तयार होतील. त्यासाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी तुमच्या पाठीशी कायम राहील, असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी लांजा येथे व्यक्त केला.

या कार्यक्रमात कै. काका सरफरे व्याख्यानमाला यांच्यावतीने सुबोध सरफरे यांनी आकर्षक भेटवस्तू देऊन तालुक्यातील एकूण ४६ विद्यार्थ्यांचा गौरव केला. महंमद रखांगी यांनी या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचे महत्व विषद करताना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक असले पाहिजे, असे सांगितले. या शिष्यवृत्तीचा उपयोग आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करावा, असे सूचित केले.

या कार्यक्रमात राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यानिकेतन माध्यमिक शाळा खावडीचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांचा व या उपक्रमाला विशेष आर्थिक सहकार्य करणारे उद्योजक सुबोध सरफरे यांचा लांजा तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने आमदार साळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक महंमद रखांगी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, लांजा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे,  दत्तात्रय देसाई, मुख्याध्यापिका आठवले, एमकेसीएलचे संचालक संतोष कोलते,  लांजा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊ वंजारे, उद्योजक सुबोध सरफरे,  संदीप दळवी, दत्ता कदम, संजय तेंडुलकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर, शिक्षण विस्तार अधिकारी विनोद सावंग, लांजा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, दत्तात्रय देसाई, मुख्याध्यापिका आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular