26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeEntertainmentदृश्यम-२ चित्रपट, १०० कोटीच्या क्लबमध्ये दाखल

दृश्यम-२ चित्रपट, १०० कोटीच्या क्लबमध्ये दाखल

दृष्यम २ ने ६४ कोटींच्या कलेक्शनसह दुसरे स्थान पटकावले आहे.

अजय देवगण चित्रित ‘दृश्यम २’ ने एका आठवड्यात १०० कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या सातव्या दिवशी या चित्रपटाने ८.६२ कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे चित्रपटाची एकूण कमाई १०४.६६ कोटींवर गेली आहे. बॉलीवूडसाठी हे वर्ष खूपच नीरस गेले. बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारे खूप कमी चित्रपट आहेत आणि आता दृश्यम २ देखील या यादीचा एक भाग बनला आहे.

चित्रपटाचे नवीनतम कलेक्शन शेअर करताना, चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले – “दृश्यम २ नाबाद आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आता सर्वांच्या नजरा दुसऱ्या आठवड्याकडे लागल्या आहेत. शुक्रवारी १५.३८ कोटी, शनिवार २१.५९ कोटी, रविवार २७.१७ कोटी, सोमवार ११.८७ कोटी, मंगळवार १०.४८ कोटी, बुधवारी ९.५५ कोटी, गुरुवारी ८.६२ कोटी. एकूण १०४.६६ कोटी.”

या वर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व हिंदी चित्रपटांपैकी ब्रह्मास्त्रने ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कलेक्शन केले होते. ब्रह्मास्त्रने पहिल्या तीन दिवसांत १११ कोटींची कमाई केली होती. दृष्यम २ ने ६४ कोटींच्या कलेक्शनसह दुसरे स्थान पटकावले आहे. भूल भुलैया २ जवळपास ५६ कोटींच्या कलेक्शनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर सम्राट पृथ्वीराज आणि गंगूबाई काठियावाडी आहेत.

अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रेया सरन आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते, परंतु कोविड दरम्यान त्यांचे निधन झाले, त्यामुळे चित्रपटाचे निर्माते अभिषेक पाठक यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही घेतली. सुमारे ६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘दृश्यम २’ ने आता रिलीजच्या केवळ सात दिवसांत त्याच्या बजेटच्या जवळपास दुप्पट नफा कमावला आहे. चित्रपटगृहांमध्ये अजूनही हा चित्रपट दमदार कलेक्शन करत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular