24.4 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या...

Vivo X 200 स्मार्टफोन सीरीज उद्या लॉन्च होणार आहे…

टेक कंपनी Vivo उद्या (12 डिसेंबर) X...
HomeRatnagiriमुंबई मेट्रो चालवणार रत्नागिरीची कन्या

मुंबई मेट्रो चालवणार रत्नागिरीची कन्या

तिने मुंबई मेट्रोच्या लोको पायलट या पोस्टसाठी लेखी परीक्षा त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत, सायकोमेट्रिक टेस्ट आणि आरोग्य तपासणी असे टप्पे पार केले.

रत्नागिरीच्या नाचणे भागातील मुलगी मुंबईची मेट्रो चालवणार आहे. यामुळे तालुक्यातून अनुयाचे विशेष अभिनंदन केले जात आहेत. नाचणे गावात स्वत:चा वेल्डिंगचा व्यवसाय करणारे दिलीप करंबेळकर यांच्या मुलीलाही वडिलांच्या या व्यवसायामध्ये रुची होती. याच आवडीमुळे अनुयाने शिर्के हायस्कूलमधून दहावी झाल्यानंतर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात एमसीव्हीसी इलेक्ट्रॉनिक्स मधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने मुंबईतील विवेकानंद महाविद्यालयातून इन्स्ट्रुमेंटेशनचा डिप्लोमा पूर्ण केला.

हे शिक्षण सुरु असतानाच तिला मुंबई मेट्रोच्या पदाबाबत माहिती मिळाली. जागतिक स्तरावर स्पर्धा करणाऱ्या मुंबईच्या पहिल्या मेट्रो वनच्या लोको पायलटपदी रत्नागिरी तालुक्यातील नाचणे गावाची कन्या अनुया दिलीप करंबेळकर हिची नियुक्ती झाली आहे. तिच्या या यशाने नाचणे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सर्व स्तरातून तिचे अभिनंदन देखील केले जात आहे.

तिने मुंबई मेट्रोच्या लोको पायलट या पोस्टसाठी लेखी परीक्षा त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत, सायकोमेट्रिक टेस्ट आणि आरोग्य तपासणी असे टप्पे पार केले. या सर्व परीक्षा उत्तमरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर अनुया हिची मुंबई मेट्रोच्या लोको पायलटपदी नियुक्ती झाली. ती शिवसेनेच्या ठाकरे गट महिला उपतालुकाप्रमुख तथा नाचणे ग्रामपंचायत सदस्या रेश्मा कोळंबेकर यांची कन्या आहेत.

मुंबई मेट्रो तर्फे तिला, “तुम्ही आमच्या मुंबई मेट्रो वन फॅमिलीचा एक भाग म्हणून आम्हाला आनंद होत आहे. तुमची आमच्या कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी निवड केली गेली आहे. तुमच्याकडील गुण आणि क्षमतेमुळे जे पुढे मुंबई मेट्रो वनच्या यशोगाथेला हातभार लावतील. आमच्या मुंबई मेट्रो परिवारामध्ये आम्ही तुमचे पुन्हा एकदा स्वागत करताना अतिशय आनंद होत आहे”.

RELATED ARTICLES

Most Popular