23.9 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRajapur...... तोपर्यंत आंम्ही टोलवसुली करू देणार नाही, राजापूर वासियांचा निर्धार

…… तोपर्यंत आंम्ही टोलवसुली करू देणार नाही, राजापूर वासियांचा निर्धार

ठेकेदाराने पूर्वी केलेल्या आश्वासनांची न करण्यात आलेली पुर्तता यामुळे राजापुरातील हातिवले येथील टोल वसुलीला राजापूर वासीयांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

राजापूर तालुक्यातील वाटूळ ते तळगाव टाकेवाडीपर्यत रस्त्याचे अपुर्ण असलेले काम, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना जागेच्या बदल्यात न मिळालेला मोबदला, ठेकेदाराने पूर्वी केलेल्या आश्वासनांची न करण्यात आलेली पुर्तता यामुळे राजापुरातील हातिवले येथील टोल वसुलीला राजापूर वासीयांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण असताना तालुक्यातील हातिवले येथे उभारण्यात आलेल्या नाक्यावर टोलवसुलीला सुरुवात होणार आहे. टोल वसुलीबाबतची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून प्रसिद्ध झाली आहे.

परंतु, जोपर्यंत ही कामे पुर्ण होत नाहीत आणि स्थानिकांना टोलमाफी दिली जात दिली नाही तोपर्यंत आंम्ही टोलवसुली करू देणार नाही असा ईशारा शनिवारी राजापूर पोलीस स्थानकात झालेल्या बैठकी सर्वपक्षिय पदाधिकारी व संघटनांनी दिला आहे. यासाठी सर्व पक्षांची मंडळी अधिकारी आणि कार्यकर्ते यांची मात्र राजकारण बाजूला सोडून एकजूट दिसून आली आहे.

यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे कैफीयत मांडून निवेदन सादर केले जाणार आहे. शनिवारी राजापूर पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी महामार्ग अधिकारी, महामार्ग ठेकेदार व टोल वसुली ठेकेदार आणि सर्वपक्षियांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महामार्ग ठेकेदार व महामार्ग अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे जर स्थानिकांच्या प्रश्नांना डावलण्यात येत असेल तर आम्ही दाद कोणाकडे मागायची असा स्थानिकांनी थेट प्रश्न केला आहे. त्यामध्ये गुरुवार ता. १ पासून टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून प्रसिद्ध केली आहे. मात्र प्रत्यक्षात अद्याप टोलवसुली सुरू झालेली नाही.

RELATED ARTICLES

Most Popular