28.9 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeChiplun२ सांबरांची शिंगे विक्रीसाठी आणणारे दोन संशयित ताब्यात

२ सांबरांची शिंगे विक्रीसाठी आणणारे दोन संशयित ताब्यात

चिपळूण येथील सवतसडा येथे २ सांबरांची शिंगे विक्रीसाठी आणणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने आणि चिपळूण पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

दापोलीतील व्हेलची उलटी विकण्यासाठी आलेल्या तरुणांना, पुणे येथे डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेण्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या अवयवांच्या विक्री प्रकरणाने डोके वर काढले आहे. अशी तस्करीची प्रकरणे कोकणात पुन्हा वाढू लागल्याने वन्य प्राण्यांची सुरक्षा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकवेळी वन विभाग आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अशी होणारी तस्करी वेळीच हाणून पाडली जाते.

चिपळूण येथील सवतसडा येथे २ सांबरांची शिंगे विक्रीसाठी आणणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने आणि चिपळूण पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गाडी आणि इतर मुद्देमाल असा एकूण २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेला शनिवार रोजी काही संशयित वन्यजीव प्राण्यांचे अवयव विक्रीसाठी चिपळूणला घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यानुसार गुन्हे शाखेने चिपळूण पोलिसांच्या मदतीने सवतसडा नजीक मुंबई – गोवा महामार्गवर सापळा रचला. काही वाहनांची कसून तपासणी केल्यानंतर एका परजील्ह्यातील वाहनामध्ये २ सांबरांची भरीव शिंगे मिळून आली. संशयितांवर वन्य जीव (संरक्षण ) अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८ व ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोरकर, पोलीस हवालदार भागणे, झोरे, डोमणे, पालकर, पोलीस नाईक कांबळे, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील व चिपळूण तपासणी नाका येथील वनरक्षक कृष्णा इरमाले यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular