25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriरत्नागिरीतील लायन्स आय हॉस्पिटल सेवा पूर्ववत सुरु

रत्नागिरीतील लायन्स आय हॉस्पिटल सेवा पूर्ववत सुरु

रत्नागिरी मध्ये कोरोनाची वाढती स्थिती पाहता, शासकीय आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोरोनामुळे अनेक निर्बंध घालण्यात आले होते. गर्दी होणार नाही अशी स्थिती लक्षात घेऊन सर्व हॉस्पिटलचे कामकाज सुरु होते. रत्नागिरी मधील लायन्स आय हॉस्पिटल मधील सर्व सोयीयुक्त पुन्हा पूर्ववत सुरु झालेल्या आहेत.

रत्नागिरीतील लायन्स आय हॉस्पिटलची कोरोना काळातील समाजकार्यासाठी सर्व देशामध्ये कीर्ती पोहोचली आहे. हे आय हॉस्पिटल एम आय डी सी रत्नागिरी भागामध्ये असून, आता पूर्वीच्या सर्व सेवासहित सुरू झाले आहे. मध्यंतरी कोरोनाच्या धोक्यामूळे काही सेवा काही काळाकरिता थांबवण्यात आल्या होत्या, परंतु, आता त्या सर्व सेवा पूर्वतत सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बाह्य रुग्ण तपासणी विभाग सकाळी दररोज १० ते ४ वाजे पर्यंत सुरु असणार आहे. मोतीबिंदू आणि फेको या डोळ्याच्या शस्त्रक्रिया  सवलतीच्या दरामध्ये केल्या जाणार आहेत.

लायन्स आय हॉस्पिटलमध्ये अधिकाधिक अत्याधुनिक सुविधा सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी कायम प्रयत्नशील असल्याने हॉस्पिटल तर्फे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये बाहेरून तपासणी किंवा ऑपरेशन साठी येणारे असतात त्यामध्ये लहान मुलांच्या उपचारासाठी बाल नेत्ररोग तज्ञ डॉ. अभिजित मिसाळ दर मंगळवारी लायन्स हॉस्पिटल येथे रुग्णांना सेवा देणार आहेत. रेटिना तज्ञ डॉ. अमित गडकर महिन्याच्या चौथा रविवारी उपस्थित राहणार आहेत. तसेच फेको तज्ञ डॉ. अमित पवार महिन्याच्या दुसऱ्या रविवारी रुग्णांच्या तपासणी आणि ऑपरेशनसाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच लायन्स हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेल्या डॉ. क्रांती कुत्तुरवार या नेत्र तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दररोज उपस्थित असणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी परिसरातील सर्व नागरिकांनी डोळ्यांच्या सर्व समस्यांवर उपचारासाठी लायन्स आय हॉस्पिटलचा लाभ घ्यावा, असे आवाहन लायन्स हॉस्पिटल तर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular