26.3 C
Ratnagiri
Tuesday, July 15, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeSportsधावपटू मिल्खासिंग यांचे निधन

धावपटू मिल्खासिंग यांचे निधन

देशातील सर्वोत्तम धावपटू आणि भारताचे नाव जगभर पोहोचवणारे मिल्खासिंग यांचे काल रात्री ११:३० वाजता निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच कोरोना मधून ते बाहेर पडले होते, पण काल रात्री शुक्रवारी मिल्खा सिंग यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. याच आठवड्यात मिल्खासिंग यांची पत्नी निर्मल मिल्खासिंग यांचे निधन झाले होते. मिल्खासिंग यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला तर निर्मल मिल्खा सिंग यांचे वय ८५ होते.

काही दिवसांपूर्वीच मिल्खा सिंग यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देऊन डॉक्टरांनी घरी देखील पाठवले होते पण अचानक काल त्यांची तब्येत बिघडल्यामुळे पंजाब मधील पीजीआय दवाखान्यांमध्ये त्यांना दाखल केले गेले पण डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.

milkha singh passed away (3)

फ्लाइंग सिख या नावाने मिल्खा सिंग ओळखले जायचे याच आठवड्यामध्ये त्यांची पत्नी निर्मल मिल्खासिंग या कोरोनामुळे निधन पावल्या होत्या आणि त्यावेळेस मिल्खा सिंग हे दवाखान्यामध्ये आयसीयूमध्ये ऍडमिट होते व त्याच कारणाने त्यांच्या पत्नीच्या अंत्यविधीला देखील ते उपस्थित राहू शकले नव्हते.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही याबाबत दुःख व्यक्त केले आहे ते म्हणाले, भारताने आज एक महान खेळाडू  हरवला आहे. मिल्खासिंग यांच्या जीवनावर फरहान अख्तर यांनी भाग मिल्खा भाग हा चित्रपट देखील बनवला होता. फरहान अख्तर यांना मिल्खासिंग यांच्या निधना बाबत कळल्यावर त्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular