28.4 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

बनावट कागदपत्राने वाहने विकणारी टोळी पकडली…

कोल्हापूर टेंबलाईवाडी (ता. करवीर) येथील जुन्या वाहनांची...

चिपळूणात अतिवृष्टीने दरड कोसळली, घरांना धोका

शहरातील खंड भागात शुभम अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला...
HomeEntertainmentनायजेरियन टोळीकडे अभिनेत्री ऐश्वर्या रायचा बनावट पासपोर्ट

नायजेरियन टोळीकडे अभिनेत्री ऐश्वर्या रायचा बनावट पासपोर्ट

ऐश्वर्या रायच्या बनावट पासपोर्टचा त्यांनी काय उपयोग केला, याबाबत पोलीस त्यांच्याकडे चौकशी करत आहेत.

नोएडा पोलीस आणि सायबर सेलने नायजेरियन टोळीच्या तीन सदस्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा बनावट पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. तपासा दरम्यान, पोलिसांनी टोळीच्या सदस्यांकडून बनावट US$१.३ दशलक्ष आणि £१०,५०० जप्त केले. ऐश्वर्या रायच्या बनावट पासपोर्टचा त्यांनी काय उपयोग केला, याबाबत पोलीस त्यांच्याकडे चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीचे सदस्य कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून महागड्या किमतीत औषधी वनस्पती देत ​​असत. ही नायजेरियन टोळी बऱ्याच दिवसांपासून मॅट्रिमोनिअल साइट्स आणि डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून लोकांना टार्गेट करत होती. याशिवाय गुन्हेगारांनी लष्करातील एका निवृत्त कर्नलचीही १ कोटी ८१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. त्यानंतर कर्नलने पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतरच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि या टोळीचा पर्दाफाश केला.

पोलिस अधिकारी अभिषेक वर्मा यांनी मीडियाला सांगितले की, नायजेरियन गुन्हेगारांनी स्वतःची ओळख ईक उफेरेमुकेवे, एडविन कॉलिंस आणि ओकोलोई डेमियन अशी सांगितली. तिघांनाही ग्रेटर नोएडा येथून अटक करण्यात आली आहे. अ‍ॅबॉट फार्मास्युटिकल्स कंपनीसह अन्य कंपन्यांचे मालक असल्याचे भासवून ही टोळी लाखो रुपये लुटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी पुढे सांगितले की, अटक करण्यात आलेल्या तीन गुन्हेगारांकडे व्हिसा आणि पासपोर्टही नव्हते. या तिघांकडून ऐश्वर्याचा पासपोर्ट, सहा फोन, अकरा सिम आणि लॅपटॉप पेनड्राइव्ह आणि तीन कार जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, अभिनेत्रीच्या पासपोर्टवरून या गुंडांनी कोणते गुन्हे केले आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही.

RELATED ARTICLES

Most Popular