25.9 C
Ratnagiri
Tuesday, March 19, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeSportsपहिल्या कसोटीत टीम इंडिया विजयापासून ४ विकेटने दूर

पहिल्या कसोटीत टीम इंडिया विजयापासून ४ विकेटने दूर

चौथ्या दिवसाच्या खेळात झाकीर हसनने बांगलादेशकडून पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडिया विजयापासून ४ विकेट दूर आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशने दुसऱ्या डावात ६ बाद २७२ धावा केल्या आहेत. शाकिब अल हसन ४० आणि मेहदी हसन मिराज ९ धावांवर नाबाद आहे. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ३ बळी घेतले आहेत. उमेश यादव, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांना १-१ विकेट मिळाली. रविवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी २४१ धावा कराव्या लागणार आहेत.

चौथ्या दिवसाच्या खेळात झाकीर हसनने बांगलादेशकडून पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले. पदार्पणातच शतक झळकावणारा तो चौथा बांगलादेशी फलंदाज ठरला आहे. नजमुल हसन शांतोने ६७ धावांची खेळी केली. हसन आणि शांतो यांनी पहिल्या विकेटच्या भागीदारीत १२४ धावा जोडल्या.

या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ४०४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडियाने दुसरा डाव २५८/२ धावांवर घोषित केला आणि यजमानांना ५१३ धावांचे लक्ष्य दिले. चौथ्या दिवसाचे पहिले सत्र बांगलादेशच्या नावावर होते. भारतीय गोलंदाज विकेटसाठी झगडत असताना त्यांच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. या सत्रात यजमानांनी ७७ धावा केल्या.

या सत्रात गोलंदाजांनी भारताला कमबॅक केले. उपाहारापासून चहापानापर्यंत बांगलादेशच्या फलंदाजांनी ५७ धावा केल्या. तर भारतीय गोलंदाजांनी तीन विकेट घेतल्या. प्रथम उमेश यादवने शांतोला बाद करून सलामीची भागीदारी मोडली. त्यानंतर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी पाहुण्या संघाला दोन धक्के देत मागे ढकलले. अक्षर पटेलने शेवटच्या सत्रात शानदार गोलंदाजी केली. या सत्रात त्याने दोन विकेट घेतल्या. अश्विनच्या वाट्याला एक विकेट आली. संध्याकाळच्या चहापानानंतर बांगलादेशने ९६ धावा केल्या. तर भारताने ३ विकेट घेतल्या.

RELATED ARTICLES

Most Popular