25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeSindhudurgजागेच्या वादातून, शेजाऱ्यावर तलवारीने वार

जागेच्या वादातून, शेजाऱ्यावर तलवारीने वार

वडिलांना सोडविण्यासाठी गेलेल्या मुलाच्या हातावरही वार करण्यात आला. त्यात तोही जखमी झाला.

कणकवली तालुक्यातील सांगवे-आंबेडकरनगर येथे घराच्या कुंपण बांधकामाच्या वादातून तलवारीने हल्ला करण्यात आला. यामध्ये बाप-लेक जखमी झाले. हा प्रकार बुधवारी रात्री नऊच्या सुमारास झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

काल रात्री नऊच्या सुमारास अजय पवार यांनी राजेंद्र यांना जमिनीच्या वादावरून विचारणा केली. तू आमच्या जागेत कुंपण का घातले, असे विचारले. यात शाब्दिक वाद झाला. यावेळी शेजारील असलेले सुनील आणि दिलीप हे तेथे आले. फिर्यादी राजेंद्र यांचा मुलगा आवाज ऐकून घराबाहेर आला. यावेळी अजय पवार यांनी आपल्या हातातील तलवारीने फिर्यादी राजेंद्र यांच्या ओठावर आणि डाव्या हातावर वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. वडिलांना सोडविण्यासाठी गेलेल्या मुलाच्या हातावरही वार करण्यात आला. त्यात तोही जखमी झाला.

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, अजय मारुती पवार (वय ३९), सुनील अनिल कांबळे (वय २५) आणि दिलीप दौलत कांबळे (वय ५०, सर्व रा. सांगवे-आंबेडकरनगर) या संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळाली माहिती अशी फिर्यादी राजेंद्र कांबळे यांनी आपल्या घरालगत कुंपण घातले होते. त्यांच्या घराच्या शेजारी अजय पवार यांचे घर आहे. यावरून निर्माण झालेल्या वादात, या मारहाणीत सांगवे-आंबेडकरनगर येथील राजेंद्र श्रीधर कांबळे (वय ४५) आणि त्यांचा सोळा वर्षांचा मुलगा जखमी झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून आज त्यांना सोडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक रुग्णालयात, तर दुसऱ्या पथकासह पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेतील मारहाणीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले जाईल, अशी माहिती तपासी अधिकारी अनिल हडळ यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular