27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...
HomeKokanमुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत करण्यासाठी, १२ कोटींचा निधी मंजूर

मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत करण्यासाठी, १२ कोटींचा निधी मंजूर

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी रायगडपासून आंदोलनाचा इशारा देताच राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग आली आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला साधारण तप उलटून गेला असेल, परंतु, अद्याप देखील हे काम अपूर्णच आहे. प्रत्येक विभागातून महामार्गाच्या दुरुस्ती कारणासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी रायगडपासून आंदोलनाचा इशारा देताच राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग आली आहे. या विभागाने संयुक्त बैठक घेऊन चौपदरीकरणाचे काम जानेवारीत नव्याने सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.

महामार्गाचे काम सुमारे ११ वर्षांपासून रखडलेलेच आहे. सध्या महामार्गाची चाळण झाली आहे. पनवेल ते संगमेश्वर दरम्यान या टप्प्यात भलेमोठे खड्डे पडले असल्याने, पेण ते कोलाड, तिसे रस्ताच पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. टप्प्याटप्प्याने करण्यात येणाऱ्या महामार्गाच्या कामाला मुहूर्तच मिळत नसल्याने, महामार्गालगतच्या अनेक जिल्ह्यांनी विविध मार्गाने आंदोलने करण्यास सुरुवात केली. रस्त्यावरील साधे खड्डे भरून हा मार्ग सुस्थितीत करण्यास एनएचएआयला अपयश आल्याने, वाकणनाका येथे अभिनव मार्गाने भजन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

या संदर्भात एनएचएआयचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनी त्यांच्या पनवेल कार्यालयात काल संयुक्त बैठक बोलावली होती. मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत करण्यासाठी विशेष बाब म्हणून १२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तातडीने दुरुस्तीला सुरुवात करण्यात येणार आहे. खड्डे भरण्यात कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल,  असे आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनी आज दिले आहे. त्यामुळे महामार्गाचे काम लवकरच मार्गी लागणार आणि रस्ते सुरळीत होणार असे चिन्ह दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular