25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKokanपिठाच्या चक्कीत पाय अडकून गिरणी मालकाला गंभीर दुखापत

पिठाच्या चक्कीत पाय अडकून गिरणी मालकाला गंभीर दुखापत

पिठाच्या चक्कीत पाय अडकून गिरणी मालक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राम आळी परिसरात घडली. जखमी झालेल्या अनिल भार्गव पोटफोडे यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनिल पोटफोडे यांची राम आळीमध्ये पिठाची चक्की असून शनिवारी ते नेहमीप्रमाणे चक्कीत पीठ काढीत असताना त्यांचा पाय अचानक चक्कीच्या पट्ट्यावर पडला. त्यांचे दोन्ही पाय चक्कीच्या- पट्ट्यात अडकल्याने दोन्ही पायाना गंभीर दुखापत झाली आहे.

ही घटना घडताच त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ कोल्हापूर येथे हलविण्यात आले. दरम्यान यापूर्वी देखील त्यांचा असाच अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्या बोटाला गंभीर इजा झाली होती. पोटफोडे यांच्या अपघाताची माहिती मिळताच राम आळीतील दुकानदारांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची नोंद शहर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.अनिल पोटफोडे हे रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध व्यवसायिक आहेत. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध प्राचिन श्री राम मंदिराचे ते एक मानकरी आहेत. मंदिरातील हत्तीच्या सजावटीचा मान त्यांच्याकडे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular