28.4 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriप्रस्ताव गेला नसताना ६० कोटी रुपये मंजूर झालेच कसे ! - मिलिंद...

प्रस्ताव गेला नसताना ६० कोटी रुपये मंजूर झालेच कसे ! – मिलिंद कीर

स्वच्छ रत्नागिरी सुंदर रत्नागिरी यासाठी रत्नागिरी प्रसिद्ध होती. रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हल्लकलोळ माजला. या सभेमध्ये रत्नागिरीतील अनेक विषय चर्चिले गेले. त्यातील मुख्य विषय म्हणजे रत्नागिरी शहराच्या रस्त्यांची झालेली चाळण.

रत्नागिरी मधील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेला फक्त लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे वक्तव्य माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केले आहे. प्रत्येक वेळेला खोटी करणे पुढे करून कधी ठेकेदाराला दोषी ठरविले जात आहे तर काही वेळेला अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तींचे कारण देण्यात येत आहे. शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ६० कोटी रुपये मंजूर करून आणणाऱ्या लोकप्रतिनिधीनी जनेतेची दिशाभूल करू नये. ६० कोटी रुपयेही दिसले नाहीत आणि रस्त्याची कामेही झालेली दिसलेत नाही. आणि मूळ प्रश्न असा आहे कि, जर नगर परिषदेतून प्रस्तावच गेला नाही तर एवढे ६० कोटी रुपये मंजूर झालेच कसे ! असा सवाल राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल कीर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. १५ मे पर्यंत रत्नागिरीतील ९०% रस्ते सुस्थितीत होतील असे लोकप्रतिनिधी जनतेला आश्वासन देतात. पण १५ मे ला चक्रीवादळ आले, आधी नव्हे तर मग १५ मे च्या आधी किती टक्के रस्त्यांची डागडुजी करण्यात आली ते रत्नागिरीतील सुज्ञ नागरिकांसमोर आहेच. त्यावरून लॉक प्रतिनिधी किती आपला शब्द पाळतात, किती खर बोलतात आणि किती खोटे हे जनतेच्या लक्षात येईलच. खड्डया-खड्ड्यातून मार्ग काढताना जनतेला शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याचे कीर यांनी सांगितले. त्यामुळे सध्या रत्नागिरीमध्ये खोट बोला, पण रेटून बोला हा प्रकार सुरु असल्याचा आरोप मिलिंद कीर यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular