25.6 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKhedजगबुडी नदीतील गाळ न काढल्यास आंदोलन छेडणार : मा.आमदार संजय

जगबुडी नदीतील गाळ न काढल्यास आंदोलन छेडणार : मा.आमदार संजय

येत्या “आठवडाभरात जगबुडी नदीतील गाळ काढला गेला नाही, तर अर्धनग्न अवस्थेत जगबुडी नदीत आंदोलन केले जाईल, असा इशारा दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. पावसाळा तोंडावरती आला तरी देखिल प्रशासनाकडून खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीतील गाळ न काढल्यामुळे यंदा देखिल शहरात पूर भरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे व्यापारी चिंतेत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये शहराला पुराने वेढले होते. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते, त्यावेळी नदीतील गाळ काढण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते, मात्र पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना जगबुडी नदीतील गाळ जैसे थेच आहे. या निषेधार्थ दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.’ दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये जगबुडी नदीने रौद्ररूप धारण केले होते. मोठ्या प्रमाणावरती जगबुडी नदीच्या पात्रात गाळ साचल्यामुळे थोडासा पाऊस झाला तरी देखिल खेड शहरात पुराचे पाणी शिस्ते परिणामी व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान होते.

दरवर्षी करोडो रुपयांचे नुकसान खेडच्या बाजारपेठेत व्यापान्यांचे व नागरिकांचे होते. दोन वर्षांपूर्वी पुराची मोठी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी प्रशासनाने जगबुडी नदीतील गाळ काढण्याचे आश्वासन दिले होते, त्यानंतर गेल्या वर्षी देखिल खेडमधील सर्व व्यापारी संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना जाऊन गाळ काढण्यासंदर्भात पत्र देखिल दिले होते, मात्र व्यापाऱ्यांच्या गाळ करण्याच्या या मागणीला प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत. रायगड जिल्ह्यातल्या सावित्री नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्याचे काम देखिल मोठ्या प्रमाणावर झाले आणि अजून सुरू देखिल आहे, मग खेडच्या जगबुडी नदीचे गाळ करण्याचे घोडे नेमकं कुठे अडले, असा प्रश्न माजी आमदार संजय कदम यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे येथे जर गाळ काढला गेला नाही, तर यंदाच्या पावसाळ्यात देखिल पुरामुळे नुकसान ठरले आहे.

स्थानिक व्यापाऱ्यांनी देखिल नदीतील गाळ काढण्यासाठी वर्गणी काढून आर्थिक तरतूद करत शासनाला सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली असताना देखिल प्रशासनाकडून यावर्षी गाळ काढण्यासाठी विलंब झाला आहे. आता केवळ एक आठवडा उरला असून येत्या दोन दिवसात जर गाळ काढायला सुरुवात केली नाही, तर सर्व व्यापारी बंधू नागरिकांसोबत आपण स्वतः जगबुडी नदीच्या पात्रात उतरून अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीम ध्ये जगबुडी नदीने रौद्ररूप धारण केले होते. मोठ्या प्रमाणावरती जगबुडी नदीच्या पात्रात गाळ साचल्यामुळे थोडासा पाऊस झाला तरी देखिल खेड शहरात पुराचे पाणी शिरते. परिणामी व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. दरवर्षी करोडो रुपयांचे नुकसान व्यापान्यांचे व नागरिकांचे होते.

RELATED ARTICLES

Most Popular