26.7 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeKokanगणेशोत्सवासाठीच्या कोकणातील रेल्वे बुकिंग चार्ट नावासहित जाहीर करा - मनसेची मागणी

गणेशोत्सवासाठीच्या कोकणातील रेल्वे बुकिंग चार्ट नावासहित जाहीर करा – मनसेची मागणी

रेल्वे डिपार्टमेंटने गणेशोत्सवासाठी काढल्या गेलेल्या कोकणातील सर्व रेल्वे गाड्यांच्या कन्फर्म तिकिटांचा बुकिंग चार्ट नावासहित जाहीर करावा, अशी मागणी मनसे पदाधिकारी गणेश कदम यांनी केली आहे. यामुळे सर्व दलाल आपोआप सापडतील, असेही त्यानी म्हटले आहे. नुकतेच मनसेचे आमदार राजूं दादा पाटील यांनी अल्पावधित आरक्षण फुल झाल्यामुळे कोकणातील चाकरमानी यांना गणेशोत्सव काळात होणाऱ्या त्रासाबद्दल संताप व्यक्त करून राज्यातील वा राज्याबाहेरील एजंट तिकिटं काढून आरक्षण फुल करत असल्याचा संशय व्यक्त केला. यासाठी कोकणी बांधवांच्या पाठीशी उभे राहून थेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्रकाद्वारे निवेदन दिले.

त्याबद्दल कोकणाशी नाळ जोडलेले मनसेचे पदाधिकारी गणेश कदम यांनी समस्त कोकणवासियांच्या वतीने आमदार राजू पाटील यांचे आभार व्यक्त केले. परंतु यात रेल्वे खात्यातीलही काही अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप गणेश कदम त्यांनी केला आहे, जर पाचच मिनिटांत सर्व गाड्यांचे आरक्षण कन्फर्म होऊन फुल होते तर कन्फर्म झालेल्या आरक्षणचा चार्ट रेल्वे खात्याने लवकरात लवकर नावासहित जाहीर करावा तरच जनतेलाही समजेल, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular