28.4 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

बनावट कागदपत्राने वाहने विकणारी टोळी पकडली…

कोल्हापूर टेंबलाईवाडी (ता. करवीर) येथील जुन्या वाहनांची...

चिपळूणात अतिवृष्टीने दरड कोसळली, घरांना धोका

शहरातील खंड भागात शुभम अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला...
HomeMaharashtraलालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

मुंबईतील सुप्रसिध्द लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ९० वे वर्ष असून बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या मुहुर्तावर बाप्पाच्या मूर्तीचा पाद्यपूजन सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न झाला. राज्यात पावसाळा सुरू झाला नसला तरी पावसाळ्यातील सण- उत्सवांची तयारी मात्र सुरू झाली आहे. गणेशोत्सवात करोडों गणेश भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं बुधवारी पाऊल पूजन पोर पडलं. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर पहाटेच साधेपणाने लालबागच्या राजाच्या मूर्तीचं पाऊल पूजन केलं. पाऊल पूजनानंतर मूर्तीकार लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरवात कस्तात.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं ९०वं वर्ष आहे. लालबागच्या राजाचे ९० व्या वर्षाचं गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ७ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता कांबळी आर्ट्स चित्रशाळेत पाद्यपूजन सोहळा पार पडला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि मूर्तिकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते पाद्यपूजन करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular