27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...

कोत्रेवाडी कचरा प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा…

कोत्रेवाडी येथील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणारा डंपिंग...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये गांजा बाळगणाऱ्याला तरूणाला अटक

रत्नागिरीमध्ये गांजा बाळगणाऱ्याला तरूणाला अटक

रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट परिसरात बेकायदेशीरपणे १६ हजार ८०० रुपयांचा १.७३ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आपल्याजवळ बाळगणाऱ्याला शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एकूण ३४ हजार ३३० रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवार २५ जून रोजी रात्री ९.४० वा. करण्यात आली. अश्रफ उर्फ अडर्या महमूद शेख असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. नाव आहे. रविवारी रात्री मच्छिमार्केट येथील खान कॉम्प्लेक्स येथे गैरकायदा अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, शहर पोलिसांनी धाड टाकून संशयित आरोपी अश्रफ शेखला अटक केली. त्याच्याकडून १६ हजार ८०० रुपयांचा अंमली पदार्थ, रोख १२ हजार ५३० रुपये आणि ५ हजार रुपये किंमतीच मोबाईल असा एकूण ३४ हजार ३३० रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular