23.3 C
Ratnagiri
Tuesday, February 4, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriरोज २० हजार लसीकरण होणे गरजेचे – अॅड. दिपक पटवर्धन

रोज २० हजार लसीकरण होणे गरजेचे – अॅड. दिपक पटवर्धन

रत्नागिरीमधील कोरोनाच्या संकटातून मुक्ती मिळण्यासाठी सरकार विविध तर्हेने प्रयत्नशील आहेच, परंतु एकट सरकार कोरोनाला रोखण्यासाठी पुरेसे पडणार नसून, त्यासाठी राज्यातील जनतेने सुद्धा तेवढेच शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. रत्नागिरीतील जनता मागील दोन महिन्यापासून शासनाने केलेली संचारबंदी, कडक लॉकडाऊन, व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद या सर्व गोष्टी पाळण्यास शासनाला सहकार्य केले.

भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी लॉकडाऊनच्या काळातही जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या आणि मृत्यूदर वाढत असल्याने दररोज लसीकरणाची संख्या किमान २० हजार पर्यंत वाढवली गेली पाहिजे, आणि ती सुद्धा लष्करी पद्धतीने राबविली गेली पाहिजे, अशी मागणी रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे. याबद्दलचे सविस्तर निवेदन त्यांनी पालकमंत्री अॅड. अनिल परब यांना मेल द्वारे पाठविले आहे.

रत्नागिरीमध्ये सध्या कोविड सेंटर उघडण्याची एक प्रकारची स्पर्धा सुरु आहे.परंतु, या कोविड सेंटरमध्ये आरोग्य अधिकारी, परिचारिका, स्थानिक तज्ञ डॉक्टर आवश्यकतेनुसार उपलब्ध नाहीत, हि खरीच एक शोकांतिका आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणजे रुग्णाच्या जीवाशी होणारी हेळसांड, औषधोपचारांचा अपुरा पुरवठा आणि रुग्णाची अवस्था गंभीर होत आहे. त्यामुळे सर्व कोविड सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीमच अनिवार्य करावी अशी मागणी अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, संपूर्ण कोरोना काळ बेरोजगारी, आप्तस्वकीयांचे मृत्यू यामुळे हा निराशाजनकच असल्याने करण्यात आलेल्या लॉकडाऊन बद्दल अनेकांची विविध मते असू शकतात. पण कोरोनामुक्त रत्नागिरी करायची असेल तर सर्व नागरिकांनी मिळून प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular