26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKhedवंदे भारत एक्स्प्रेस खेड थांबा फलदायी...

वंदे भारत एक्स्प्रेस खेड थांबा फलदायी…

गाडीच्या अख्ख्या एका कोचचे बुकिंग हे खेडला उतरणाऱ्या प्रवाशांकडून झाले. खेड स्थानकरून वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत ही दिलासादायक बाब ठरली आहे।

कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या खेड स्थानकावरील थांब्याबाबत एक सुखद धक्का मिळाला आहे. भारतीय रेल्वेच्या या हायटेक गाडीला रेल्वे बोर्डाने चिपळूणऐवजी खेड थांबा दिल्याने अनेकांना आश्चर्याचा, तर अनेकांना , सुखद धक्का बसला होता; मात्र हा थांबा आता जास्त उत्पन्न देणारा ठरत असून, प्रवाशांची पसंती या गाडीला मिळत आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची चर्चा झाल्यापासून या गाडीला कोकण रेल्वेच्यामार्गावर खेड थांबा देण्याचा विचार व्हावा, या संदर्भात कोकण रेल्वे तसेच मध्यरेल्वेकडे जल फाउंडेशनकडून पाठपुरावा सुरू होता. अखेर याची दखल घेत रेल्वेने तसा प्रस्ताव रेल्वेबोर्डाकडे पाठवला होता.

रेल्वेबोर्डाने अखेर वंदे भारत एक्स्प्रेसला खेड थांबा मंजूर केल्याने खेडवासीयांना सुखद धक्का बसला होता. २७ जूनपासून कोकण रेल्वेमार्गावर धावू लागलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरू झाल्यापासून काही फेऱ्यांचा अपवाद वगळला तर ही गाडी प्रवाशांनी भरून धावत आहे. विकेंडच्या कालावधीतील या गाडीच्या फेऱ्यांना तर गर्दी होत आहे. गाडीचे तिकीट महागडे असल्याने गाडीतून कोण प्रवास करणार, अशी चर्चा होत असतानाच वंदे भारत एक्स्प्रेसला खेड स्थानकावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

१० जुलैच्या डाऊन वंदे भारत एक्स्प्रेसमधून ७४ प्रवासी खेड स्थानकावर उतरले. वंदे भारत एक्स्प्रेसच्या एका कोचची क्षमता ७८ प्रवाशांची आहे. म्हणजे जवळपास या गाडीच्या अख्ख्या एका कोचचे बुकिंग हे खेडला उतरणाऱ्या प्रवाशांकडून झाले. खेड स्थानकरून वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत ही दिलासादायक बाब ठरली आहे. खेडमध्ये लोटे औद्योगिक क्षेत्र असल्याने मुंबई तसेच ठाण्यातून एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये येणाऱ्या अधिकारी वर्गामुळे वंदे भारत एक्स्प्रेसच्या एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठीदेखील खेड स्थानकासाठी बुकिंग होताना दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular