26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriखोरनिनको धरण धबधबा पर्यटनास दोन महिने बंद...

खोरनिनको धरण धबधबा पर्यटनास दोन महिने बंद…

पावसाचा जोर वाढल्याने या धरणाचा मानवनिर्मित सांडवा वेगाने वाहू लागला आहे. या ठिकाणी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने जाण्यास प्रतिबंधक आदेश देण्यात आले.

लांजा तालुक्यातील प्रसिद्ध खोरनीनको धरण धबधबा पर्यटनास दोन महिने बंदी घालण्यात आली आहे. लांजा तहसीलदार यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. अनेक हौशी पर्यटक यांचा हिरमोड झाला आहे. लांजा तालुक्यातील मुचुकुंदी धरण खोरणींनको हे पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे. या ठिकाणी बहुसंख्य पर्यटक पावसाळ्यात ये जा करीत असतात. पावसाचा जोर वाढल्याने या धरणाचा मानवनिर्मित सांडवा वेगाने वाहू लागला आहे. या ठिकाणी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आणि अतिवृष्टी असल्याने या धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंधक आदेश देण्यात आले आहेत. या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढली आहे. सांडव्या तुन वेगाने पाणी विसर्ग होत आहे. या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

त्यामुळे जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने तातडीची उपाययोजना म्हणून फौजदारी संहिता १९७३ कलम १४४ नुसार खोरणींनको धरणावर पर्यटनास बंदी तहसीलदार प्रमोद कदम यांच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे. या प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन केल्यास म हाराष्ट्र पोलीस अधिनियम ३३ मधील भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. लांजा पोलिसांना या आदेश संदर्भात सूचना करण्यात आली आहे. लघु पाटबंधारे विभागाने या खोरणींनको ठिकाणी सूचना फलक लावले आहेत. दरम्यान पावसाने जोर धरल्या पासून या खोरणींनाको धबधब्यावर हजारो पर्यटक यांनी हजेरी लावली होती. पावसाळी पर्यटन मुले या ठिकाणी राहणाऱ्या रोजगार मिळाला होता.

RELATED ARTICLES

Most Popular