32.3 C
Ratnagiri
Tuesday, April 30, 2024

मूल विक्री प्रकरणात गुहागरचे दांपत्य ताब्यात

बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश...

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराजची टीव्ही मालिकेत एंट्री

मागच्या वर्षी गणेशोत्सवात सोशल मीडियावर एक गाणं...

…तर रिक्षा चालकांचा मतदानावर बहिष्कार – प्रताप भाटकर

मुक्त रिक्षा परवाना धोरणामुळे रिक्षा व्यावसायिक अडचणीत...
HomeRatnagiriमिरजोळे गावाला धोका, भूस्खलनाचे संकट आता गंभीर

मिरजोळे गावाला धोका, भूस्खलनाचे संकट आता गंभीर

भूस्खलनामुळे तेथील शेत जमिन धोक्यात आलेली आहे. वर्षागणिक येथील एक-एक शेतकऱ्याची जमीन नामशेष होत असल्याचे गंभीर चित्र आहे.

रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे गावातील मधलीवाडी-वाडकरवाडी दरम्यानच्या खालचापाट परिसरातील शेतजमीनीत अतिवृष्टीमुळे भुस्खलन झालेले आहे. हे संकट दिवसागणिक वाढत आहे. मोठ्या प्रमाणात खोलवर जमीन खचल्याने शेतकरी हताश झाले आहेत. यापूर्वीच पाटबंधारे विभागाने १ कोटी ३५ लाखांचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवला आहे. त्याद्वारे उपाययोजनांसाठी प्राधान्याने कार्यवाही हाती घेतली जाणार होती. पण या कार्यवाहीची पतिक्षा गेल्या चार वर्षांपासून असल्याने शेतकऱ्यांना उपाययोजनांची प्रतिक्षा लागून राहिली आहे. अतिवृष्टीच्या काळात याठिकाणी होणाऱ्या या सततच्या भूस्खलनामुळे शेती संकटात आली आहे.

सातत्याने पावसाळी हंगामात होणाऱ्या अतिवृष्टीने येथील शेतजमिनीचे मोठे भूस्खलन झाले. सुमारे १५-२० फुट खोल शेतजमीन खचली आहे. या भूस्खलनामुळे तेथील शेत जमिन धोक्यात आलेली आहे. वर्षागणिक येथील एक-एक शेतकऱ्याची जमीन नामशेष होत असल्याचे गंभीर चित्र आहे. येथील शेतीचा ग्रामस्थांना मोठा आधार आहे. पण गेल्या काही वर्षांपासून या शेतीक्षेत्र निसर्गाच्या दुष्टचकात सापडलेले आहे. येथील नदीकाठी असलेली येथील शेतजमिन मोठ्या गर्तेत सापडली आहे. येथील नदीच्या पवाहाने आपला मार्ग बदलल्यामुळे एका बाजूकडील शेतजमीन धोक्यात येऊ लागली.

गेल्या काही वर्षांपूर्वी नदीच्या प्रवाहाने बाधित झालेली थोडेसे क्षेत्र आज तेवढ्यावरच थांबलेले नाही. सन २००६ पूर्वीपासून येथील या प्रकाराला पारंभ झाला. २००६ मध्ये तर याठिकाणी मोठे भुस्खलन झाले. त्यात ५-६ शेतकऱ्यांची शेतजमीन नामशेष झाली. त्यावेळी सुमारे २ एकर परिसरातील क्षेत्रात झालेले भूस्खलन आज सुमारे ६ ते ७ एकर क्षेत्रात विस्तारले आहे. भूवैज्ञानिकांकडून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासनस्तरावरून उपाययोजना करण्यासाठी तातडीने कार्यवाही त्यावेळी हाती घेण्यात आली. सन २०१९ मध्ये पाटबंधारे विभागस्तरावरून येथील भूस्खलन रोखण्यासाठी १ कोटी ३५ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

हा प्रस्ताव जिल्हा महसूल विभागाकडे पाठवण्यात आला होता. सन २०१८ मध्ये झालेल्या भूस्खलनानंतर प्रशासनस्तरावरून येथील उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू झाली होती. मात्र आवश्यक असलेल्या अपुऱ्या निधीमुळे हा प्रस्ताव थांबला होता. मात्र त्यानंतर आपत्ती पूर निधीतून भूस्खलन रोखण्याच्या उपाययोजनांसाठी विशेष प्राधान्याने कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव त्यावेळीच प्राप्त झालेला आहे.

या प्रस्तावला मंजूरी मिळताच २०१९ मध्ये पावसाळ्यानंतर भुस्खलनावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवश्यक कामांच्या कार्यवाही सुरू होणार असल्याचे जिल्हा ‘प्रशासनाकडून सांगण्यात आलेले होते. मात्र त्याठिकाणी नदीकिनारी भुस्खलन होणाऱ्या अर्ध्या भागात संरक्षक भिंत बांधण्यात आली. त्यामुळे त्या भागाकडील होणारे भुस्खलन थांबले आहे. मात्र अर्ध्या नदीपात्राकिनारी अजूनही संरक्षक भिंतीची प्रतिक्षा आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येथील भूस्खलनावरील उपाययोजना रखडल्या आहेत. दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना देखील धोका वाढलेला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular