23.9 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeChiplunनऊ तालुक्यांत ७५ फुटी राष्ट्रध्वज उभाणार २३ लाखांचा खर्च - पालकमंत्री...

नऊ तालुक्यांत ७५ फुटी राष्ट्रध्वज उभाणार २३ लाखांचा खर्च – पालकमंत्री उदय सामंत

जिल्हा नियोजन निधीतून जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत ७५ फुटी राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे.

यावर्षी देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने १५ ऑगस्टची उत्सुकता आतापासूनच अनेकांना लागली आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत प्रत्येक ठिकाणी ७५ फुटी राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहे. उत्तर रत्नागिरीत पाच तालुक्यांत या कामाला सुरुवात झाली आहे. या प्रत्येक स्तंभासाठी सुमारे २३ लाखांचा खर्च केला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा मोठा इतिहास भारतीयांपुढे उभा आहे. सुमारे दीडशे वर्षांचे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्ततेसाठी केलेला व्यापक संघर्ष सगळे भारतीय जाणून आहेत. यावर्षी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

प्रशासकीय यंत्रणेसह सामाजिक संस्थांकडूनदेखील वर्षभर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत. याशिवाय काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या १५ ऑगस्टचीदेखील तयारी सुरू आहे. जिल्हा नियोजन निधीतून जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत ७५ फुटी राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. या आधी रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील अन्य तालुक्यात राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती.

RELATED ARTICLES

Most Popular