27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriग्रामपंचायत हद्दीत रेन हार्वेस्टिंग प्रकल्प

ग्रामपंचायत हद्दीत रेन हार्वेस्टिंग प्रकल्प

शासकीय इमारतींवर शंभरहून अधिक रेन हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

शासकीय कार्यालयाच्या इमारतींसह शाळांच्या इमारतींच्या छतावरील पावसाचे पाणी संकलन करणारा रेन हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबवण्यात येणार आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये किमान एक रेन हार्वेस्टिंग प्रकल्पांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट पंचायत समितीने ठेवले आहे. त्यानुसार शासकीय इमारतींवर शंभरहून अधिक रेन हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात येणार असून त्या माध्यमातून त्या त्या परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्याला मदत होणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली हा रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासाठी शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्यकेंद्र यांच्या इमारतींची निवड करण्यात आली असून त्याचा कार्यारंभ आदेशही संबंधितांना देण्यात आल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली. कुशल आणि अकुशल लोकांना गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गंत संबंधित कामगाराला शासनाकडून किमान वेतन दिले जाते. याचा लाभ तालुक्यातील अनेकांनी घेताना रोजगार मिळवला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular