पोलिसांचा निर्वाळा वारे किनाऱ्यावरील ते गोळे गॅस कंपनीचे पोलिसांचा निर्वाळा आहे. दापोली समुद्र किनाऱ्यावर मिळणाऱ्या बेवरस चरसच्या बॅगा सापडल्यानंतर जिल्हा पोलिस सतर्क झाले आहेत. पोलिस दलाने किनारीपट्टी भागात स्थानिक ग्रामस्थ, पोलिस पोसिल पाटील आदींन याबाबत किऱ्यावरून माहिती घेण्याचे आवाहन केले होते. अनेकांनी किनारपट्टी पिंजत असताना शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आरे-वारे येथील वारे समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात पांढरे गोळे लागल्याची खबर ग्रामीण पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वारे किनाऱ्यावरील प्रवेश सर्वांसाठी बंद करण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे दोनशे किलोच्या वर हे गोळे सापडले आहे. मात्र ही कोणतीही स्फोटके किंवा अन्य संशयास्पद वस्तू नाही, असा निर्वाळा पोलिस यंत्रणेने दिला आहे. हे गोळे नेमके कशाचे आहेत, याची खात्री करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. अंमली पदार्थ सदृश्य हे गोळे होते. याबाबत पोलिस दलाने खात्री केली असता ते गॅस कंपनीचे पांढरे गोळे आहेत. कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू नाही, असे जिल्हा पोलिस दलाने सांगितले.