28.4 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

बनावट कागदपत्राने वाहने विकणारी टोळी पकडली…

कोल्हापूर टेंबलाईवाडी (ता. करवीर) येथील जुन्या वाहनांची...

चिपळूणात अतिवृष्टीने दरड कोसळली, घरांना धोका

शहरातील खंड भागात शुभम अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला...
HomeRatnagiriमस्करीची झाली कुस्करी! मित्राने दोस्तावर केले चाकूने सपासप वार

मस्करीची झाली कुस्करी! मित्राने दोस्तावर केले चाकूने सपासप वार

एका तरुणाच्या डोक्यात राग गेल्याने या रागाच्या भरात त्याने मित्रावरच हल्ला केला.

दोन मित्रांमध्ये सुरू मस्करी विकोपाला गेल्याने त्यांच्यामध्ये वाद होऊन मित्रानेच मित्रावर चाकूने वार केल्याची घटना सांडमवाडी- गावडे आंबेरे येथे घडली. याप्रकरणी तरूणाविरूद्ध पूर्णगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश मंदार तिवरेकर (वय २३) व अक्षय अशोक हळदणकर (वय २५, दोघेही रा. सांडमवाडी, गावडे आंबेरे) हे दोघे मित्र असून रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गावडे आंबेरे एस. टी. बस स्टॉपवर दोघे उभे होते. दोघांमध्ये चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असताना त्यांच्यात चेष्टामस्करी सुरू झाली. सुरूवातीला हसण्यावर चेष्टामस्करी नेण्यात आली. मात्र पुढे एका तरुणाच्या डोक्यात राग गेल्याने या रागाच्या भरात त्याने मित्रावरच हल्ला केला.

स्टॉपवर सुरू असलेली चेष्टामस्करी विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या अक्षय अशोक हळदणकर या तरूणनि प्रथमेश याच्या घरी जावून त्याच्यावर चाकूने काखेत वार केले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात प्रथमेश हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी प्रथमेश याने पूर्णगड पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अक्षय अशोक हळदणकर याच्याविरूद्ध भादंविक ३२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पो.हे.कॉ. पी. .टी. कांबळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular