25.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriगुहागर,दापोलीच्या किनार्‍यावर सापडला चरस तपास एनआयएकडे सोपविण्याच्या हालचाली

गुहागर,दापोलीच्या किनार्‍यावर सापडला चरस तपास एनआयएकडे सोपविण्याच्या हालचाली

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचा हा प्रकार असल्याने देशपातळीवर त्याचा तपास होणे आवश्यक आहे.

दापोली समुद्र किनारी सापडलेल्या चरसं या अंमली पदार्थांच्या बॅगांविषयी आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थांच्या तस्करीचा संबंध असून या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून बॅगांवर पाकिस्तान, अफगाणिस्थानची नावे आहेत. देशपातळीवर त्याचा तपास व्हावा, म्हणून एनआयएला (नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी) जिल्हा पोलिस दलाकडून प्रस्ताव देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारीक चर्चेवेळी दिली. दापोली समुद्र किनाऱ्यावर १४ ऑगस्टच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात चरस या अंमली पदार्थांच्या बॅगा सापडल्या. यामुळे संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली.

पोलिसांनी किनाऱ्यावर सर्च ऑपरेशन करून आतापर्यंत २५० किलो चरसच्या बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत. याचे बाजारभावमूल्य सुमारे १० कोटीच्यावर वर आहे. तसचे कस्टम विभागालाही मोठ्या प्रमाणात चरसच्या बॅगा सापडल्या आहेत. कस्टम विभागालाही मोठ्या प्रमाणात चरस सापडला आहे. दापोलीनंतर गुहागरच्या किनारपट्टीवरही अशाच प्रकारे अंमली पदार्थांची पाकिटे सापडली होती. याबाबत गुजरात एटीएसशी संपर्क साधला असता गुजरातमध्येही अशा प्रकारच्या चरस बॅगा सापडल्या. रायगड जिल्ह्यातही अशा प्रकारच्या बॅगा सापडल्या आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे.

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचा हा प्रकार असल्याने देशपातळीवर त्याचा तपास होणे आवश्यक आहे. याचा सारासार विचार करून जिल्हा पोलीस दलाने एनआयएमार्फत तपास व्हावा, यादृष्टीने पोलिसांच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, आम्ही किनारपट्टीचा भाग पिंजुन काढला. सर्व स्थानिक नागरिकांना याबाबत अवगत केले आहे. त्यांच्याकडुन आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे. दापोली किनाऱ्यावर सापडलेल्या या बॅगांवर पाकिस्तान, अफगाणिस्थान असे लिहिलेले आहे. त्यामुळे हा आंतराष्ट्रीय विषय असल्याने त्या स्तरावर या चरस प्रकरणाचा तपास व्हावा, म्हणून एनआयएने तपास करावा, असा प्रस्ताव देणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular