27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...
HomeRatnagiriगणेश चतुर्थी, गौरी विसर्जन व अनंत चतुर्दशीला देशी, विदेशी मद्य व माडी...

गणेश चतुर्थी, गौरी विसर्जन व अनंत चतुर्दशीला देशी, विदेशी मद्य व माडी विक्री बंद

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व देशी / विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद राहतील

श्री गणेश चतुर्थी (दि. १९ सप्टेंबर), ज्येष्ठा गौरी विसर्जन ( दि. २३ सप्टेंबर), अनंत चतुर्दशी (दि. २८ सप्टेंबर) या तीनही दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व देशी / विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. सन २०२३ या वर्षात दि. १९ सप्टेंबर ते दि. २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने, मुंबई मद्य निषेध अधिनियम १९४९ कलम १४२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी श्री गणेश चतुर्थी (दि. १९ सप्टेंबर), ज्येष्ठा गौरी विसर्जन ( दि. २३ सप्टेंबर), अनंत चतुर्दशी (दि. २८ सप्टेंबर) या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपुर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश दिले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular