23.1 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriस्वप्नाली सावंत खून प्रकरणी वर्षभरानंतर सापडला मोबाईल

स्वप्नाली सावंत खून प्रकरणी वर्षभरानंतर सापडला मोबाईल

नवीन मोबाईल घेऊन तो गाडीच्या सनरुपमध्ये लपवून ठेवला होता.

रत्नागिरीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणी वर्षभरानंतर आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली असून मुख्य आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वापरलेला मोबाईल फोन पोलिसांना सापडला आहे. एका निनावी पत्राने हा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. नेमका वर्षश्राद्धाच्या दिवशीच हा पुरावा पोलिसांच्या हाती लागला हे विशेष. गुन्ह्यात जप्त केलेल्या गाडीच्या सनरुपच्या कप्प्यात मोबाईल फोन सापडला. याचा सीडीआर काढून ज्यांना कॉल झाले आहेत, त्यांची चौकशी करून खुनाच्या गुन्ह्यात सामील असल्याचे निष्पन्न झाल्यास पुरवणी दोषारोपपत्र सादर केले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

स्वप्नाली सावंत खून प्रकरणी पोलिसांनी घराजवळून जप्त केलेल्या मानवी अवशेषांच्या डीएनए अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मांस आणि दाताचा डीएनए जुळला असल्याने तो मृतदेह स्वप्नाली सावंत यांचाच असल्याचे अहवालात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेला मोबाईल फोन पोलिसांना सापडत नव्हता. गेले वर्षभर पोलीस त्या मोबाईलच्या शोधात होते. तो पोलीस तपास करीत असताना विहिरीत सापडला होता. परंतु त्यामध्ये अपेक्षित असे काहीच मिळाले नाही. पोलिसांना निनावी पत्र एका निनावी पत्राने पोलिसांचे हे काम सोपे केले. हा मोबाईल भाई सावंत यांच्या गाडीच्या सनरुपच्या कप्प्यामध्ये असल्याचे पत्रात म्हटले होते.

 पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता तो मोबाईल पोलिसांना सापडला आहे. खुना दरम्यान स्वप्नाली सावंताच्या मोबाईलमधील सीमकार्ड काढून मोबाईल विहिरीत टाकल्याचे त्यावेळी तपासात पुढे आले होते. त्यानंतर मुख्य संशयित आरोपी भाई सावंत यांनी नवीन मोबाईल घेऊन तो गाडीच्या सनरुपमध्ये लपवून ठेवला होता. त्यामुळे स्वप्नाली सावंत हिचे लोकेशन हरचिरी, लांजा या दरम्यान दाखवले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुख्य संशयिताने ही युक्ती केली होती, मात्र एका निनावी पत्राने त्याचे भांडे फुटले. या मोबाईलमधील सीम पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा सीडीआर काढला जाणार आहे.

त्या दरम्याने ज्यांचे ज्याचे कॉल झाले आहेत किंवा आले आहेत, त्यांची चौकशी केली जाणार आहे. खुनाच्या गुन्ह्यात त्यापैकी कोण सामिल असल्याचे तपासात निष्पन्न झाले तर त्यालाही आरोपी करून पुरवणी दोषारोप पत्र दिले जाणार आहे. पोलिसांनी यापूर्वीच यातील मुख्य संशयित आरोपी आणि स्वप्नाली सावंतचा पती सुकांत गजानन सावंत, रूपेश उर्फ छोटा भाई सावंत व पम्या उर्फ प्रमोद गावणंग याना अटक केली आहे. खून केल्यानंतर स्वप्नाली सावंत यांचा मृतदेह जाळुन त्याची राख गोणपाटात भरुन टाकली जात होती. बहुतांशी राख समुद्रात टाकली. परंतु थकल्यानतंर संशयितांनी उर्वरित राख घराच्या बाजूला टाकली होती. त्याम ध्ये पोलिसांना स्वप्नाली सावंत हीचे जोडवे, मांस आणि दात सापडला होता.

RELATED ARTICLES

Most Popular