23.9 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeKhedसरकारी कर्मचाऱ्याला विनयभंगाच्या आरोपाखाली ६ वर्षे सश्रम कारावास

सरकारी कर्मचाऱ्याला विनयभंगाच्या आरोपाखाली ६ वर्षे सश्रम कारावास

आरोपी आसिफ अल्लाउद्दीन तडवी याच्याविरुद्ध पिडीत अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केली होती.

विनयभंगाचा आरोप सिद्ध झालेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याला येथील न्यायालयाने ६ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. येथील खेड अतिरिक्त सत्र न्यायालय १ चे न्यायाधीशांनी ही शिक्षा ठोठावली. आसिफ अल्लाउद्दीन तडवी (सध्या रा. शिवतर रोड, संत सेनानगर ता. खेड, जि. रत्नागिरी, मुळ रा. सावखेडा सिम पोस्ट दहीगाव, ता. यावल, जि. जळगांव) असे शिक्षा ठोठावलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध न्या. डॉ. सुधीर एम. देशपांडे, (अतिरिक्त सत्र न्यायालय – १ खेड) येथे खटला सुरु होता. विनयभंगाच्या आसेपासह त्याच्याविरुद्ध लैगिंक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १० या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी ६ वर्षे सश्रम कारावास आणि रुपये २०,००० /- इतका दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि त्याचप्रमाणे भा. दं. वि. कलम ३५४ अन्वये १ वर्ष सश्रम कारावास आणि रक्कम रुपये १०००/- दंड आणि दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, भा. दं. वि. कलम ३५४ (१) (ळ) अन्वये १ वर्ष सश्रम कारावास, भा. दं. वि. कलम ४५१ अन्वये १ वर्ष सश्रम कारावास आणि रक्कम रुपये १०००/- दंड आणि दंड न भरलेस १ महिना साधा कारावास, भा. दं. वि. कलम ५०६ अन्वये १ वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. ही घटना खेडमध्ये दि. १९ मे २०२३ रोजी घडली असून आरोपी आसिफ अल्लाउद्दीन तडवी याच्याविरुद्ध पिडीत अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार त्याच्या विरुद्ध भा. दं. वि. कलम ३५४, ३५४अ आणि बालकांचे संरक्षण अधिनियम व नियम २०१२ चे कलम ७,८,९,१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकुण ८ साक्षीदार तपासण्यात आले आणि परिस्थितीजन्य पुरावा कोर्टासमोर मांडण्यात आला. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. एन. बी. धोंगडे आणि जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजूने युक्तीवाद करुन संपूर्ण केसचे कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक नितीन भोयर, तसेच तसेच कोर्ट पैरवी सुरज मानें यांचे सहकार्य लाभले

RELATED ARTICLES

Most Popular