28.9 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकऱ्या – आ. योगेश कदम

राज्य सरकारने राज्यातील कृषी विद्यापीठासाठी जमीन देणाऱ्या...

रत्नागिरीमध्ये परिवर्तन घडवायचेच या उद्देशाने माने-महाडिक-बनेंमध्ये बंद दाराआड चर्चा?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून रत्नागिरी-संगमेश्वर...

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...
HomeRatnagiriपावसामुळे शेतकरी चिंतेत असतानाच किनारपट्टीजवळ आंब्याला फुटला मोहोर

पावसामुळे शेतकरी चिंतेत असतानाच किनारपट्टीजवळ आंब्याला फुटला मोहोर

रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी, पूर्णगड आदी खाडीकिनारी असलेल्या भागातही ऐन पावसाळ्यात आंब्याच्या झाडांना मोहर फुटला आहे.

पावसाने दांडी मारल्याने शेतकरी राजा चिंतेत असतानाच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात आंब्याच्या झाडाला मोहोर आला आहे. कोकणातही बदलत्या वातावरणाचा परिणाम निसर्गावर होताना दिसत आहे. त्याचेच हे उदाहरण मानले असल्याचे बोलले जात आहे. वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावात किल्ले निवती भागात हापूस आंब्याची झाडे मोहरली आहेत. भर पावसाळ्यात कोकणात हापुस आंब्यांना मोहोर आल्याने सर्वांना कुतूहल वाटतं आहे. भर पावसाळ्यात आलेला मोहोर प्रगतशील आंबा बागायतदारांनी टिकवून ठेवल्यास त्यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

त्यासाठी फवारण्या आणि आच्छादन करून मोहोर टिकवून त्यांची फळं बाजारपेठेत आल्यास बागायतदारांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, असे तिथले शेतकरी सांगत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी, पूर्णगड आदी खाडीकिनारी असलेल्या भागातही ऐन पावसाळ्यात आंब्याच्या झाडांना मोहर फुटला आहे. पावसाळ्यात झाडांना आंबे लागल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे, कारण भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास झाडाला लागलेले आंबे झडून जाण्याची किंवा त्याला कीड लागण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग भागात येणारे पर्यटक सुध्दा लिथ भेटी देत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी त्याचे किडीओ काढले आहेत, तर काही लोकांनी त्याचे फोटो सुध्दा काढले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular