23.3 C
Ratnagiri
Wednesday, February 18, 2026

देवरूख व संगमेश्वर बाजारपेठेत ओले काजूगर दाखल, दर चढाच

कोकणात आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...

मोहर, फळगळतीमुळे बागायतदार हवालदिल

बदलत्या हवामानाच्या दुष्टचक्रातून अजून आंबा पीक सुटलेले...

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणाचा पेच…

कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या...
HomeRatnagiriगणपतीपुळेत श्रींच्या स्पर्श दर्शनाला गर्दी

गणपतीपुळेत श्रींच्या स्पर्श दर्शनाला गर्दी

'श्रीं'च्या स्पर्श दर्शनाची सुरवात पहाटे ४.३० वाजल्यापासून झाली.

पाचशे वर्षांपूर्वीची ‘एक गाव एक गणपती’ की परंपरा गणपतीपुळे पंचक्रोशीतील आमस्थांनी जपत यंदाही गणेश चतुर्थीनिमित्त मंगळवारी (ता. १९) गणपतीपुळेतील श्रींच्या मंदिरात गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटेपासून स्थानिकांसह परजिल्ह्यातील सुमारे पाच हजारांहून अधिक भक्तांनी दर्शन घेतल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. गणपतीपुळे येथे घरोघरी गणेशाची मूर्ती न आणता भाद्रपदी गणेशोत्सव स्वयंभू श्री गजाननाच्या मंदिरामध्ये साजरा केला जातो; आज भाद्रपदी गणेश चतुर्थीनिमित्त येथे स्थानिक ग्रामस्थांना धुतल्या वस्त्रांनी गाभाऱ्यामध्ये जाऊन स्वयंभू श्री गजाननाचे दर्शन घेता येते.

‘श्रीं’च्या स्पर्श दर्शनाची सुरवात पहाटे ४.३० वाजल्यापासून झाली. स्थानिक ग्रामस्थांनी दर्शन रांगांमध्ये उभे राहून शिस्तबद्ध दर्शन घेतले. स्थानिक ग्रामस्थांसह घाट माथ्यावरून आलेल्या भक्तांचाही समावेश होता. दुपारी १२.३० वाजेपर्यंत दर्शन सुरू होते. दिवसभरामध्ये सुमारे पाच हजारांहून अधिक भक्तांनी दर्शन घेतले. पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्त दाखल झाले होते. सायंकाळी ४:३० वाजता हार फुलांनी सजवलेल्या पालखीमधून ‘श्रीं’ची पालखी परिक्रमा काढण्यात आली. या वेळी गणपतीपुळे येथील स्थानिक ग्रामस्थांसह भक्त सहभागी झाले होते.

समुद्रकिनारी बंदोबस्त – दरम्यान, मालगुंड गणपतीपुळे पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक श्रीमती कार्तिकी पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळवी, पोलिस कॉन्स्टेबल कुणाल पाटी, गुरव, होमगार्ड धावडे, सूरज जाधव यांनी गणपतीपुळे परिसर आणि किनारी भागात कडक बंदोबस्त ठेवला होता. दर्शनानंतर समुद्र स्नानासाठी पर्यटक धाव घेतात. त्यांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून ‘जीव रक्षक’ समुद्र किनाऱ्यावर नियुक्त केले होते.

RELATED ARTICLES

Most Popular