28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...

तटरक्षक दलाचा टिळक रुग्णालयाबरोबर करार

भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित...

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...
HomeRatnagiriपाच हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी

पाच हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी

दीड महिन्याच्या कालावधीत ५ हजार ३२६ ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत.

महावितरणकडून ग्राहकांना जलद गतीने नवीन वीजजोडणी सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत ५ हजार ३२६ ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत. या गतिमान सेवेबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महावितरणने दिलेल्या तत्पर सेवेमुळे गणेशभक्तही आनंदित झाले. महावितरणच्या कोकण परिमंडळात रत्नागिरी जिल्ह्यात दीड महिन्यात एकूण ३ हजार ४२७ ग्राहकांना त्यापैकी चिपळूण विभागात ८२९, खेड विभागात ८५६, रत्नागिरी विभागात १ हजार ७४२ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड महिन्यात १ हजार ८९९ ग्राहकांना त्यापैकी कणकवली विभागात ९८१, कुडाळ विभागात ९१८ ग्राहकांना नवीन वीज जोडणी दिली आहे. अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर (रत्नागिरी), अधीक्षक अभियंता विनोद पाटील (सिंधुदुर्ग) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी कर्मचारी ग्राहक सेवेसाठी तत्पर आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या धोरण व योजनांमध्ये नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘ईज ऑफ लिव्हिंग’ अर्थात जीवन सुलभीकरण या संकल्पनेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ‘ईज ऑफ लिव्हिंग’ नुसार ग्राहकाभिमुख प्रशासन राबविताना ग्राहकसेवा गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने मुख्य अभियंता परेश भागवत दैनंदिन कामकाजाचा आढावा घेऊन कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular