27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeChiplunचिपळूणची लाल-निळी जाचक पूररेषा शिथिल होण्याची शक्यता

चिपळूणची लाल-निळी जाचक पूररेषा शिथिल होण्याची शक्यता

चिपळूण शहराला पुराचा धोका लक्षात घेता वाशिष्ठी व शिवनदीच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत.

चिपळूणातील जाचक लाल-निळी पुररेषा शहराच्या विकासासाठी जाचक असलेली लाल-निळी पुररेषा शिथिल करण्याच्या प्रयत्नांसह, वाशिष्ठी, शिवनदीतील गाळ काढणे तसेच या दोन्ही नद्यांच्या बाजूला संरक्षक भिंती बांधणे, ग्रॅव्हीटी नळपाणी योजना व शहरातील विकासकामांसाठी निधी या महत्वपूर्ण विषयांवर उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी गुरुवारी मुंबईत सविस्तर चर्चा झाली. चिपळूणच्या विकासासाठी आपले पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही नामदार उदय सामंत यांनी आपल्याला दिली असल्याची माहिती चिपळूण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.

यावेळी ते म्हणाले की, आपण नुकतीच शिवसेना उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उद्योग मंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांची म .बईत भेट घेतली. या भेटीत चिपळूण शहराच्या विकासासंदर्भात आपण सविस्तर चर्चा केली. या चर्चेत सामंत यांनी चिपळूण शहराच्या विकासासाठी आपले संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी चिपळूण विकासासंदर्भात प्रश्न शहराच्या मांडतान चिपळूण शहराच्या विकासासाठी जाचक असलेली लाल-निळी पुररेषा शिथिल करण्यात यावी, अशी मागणी केली. या विषयाच्या अनुषंगाने येत्या महिन्याभरात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली जाईल, असे ना. उदय सामंत यांनी आपल्याला सांगितल्याचे शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

चिपळूण शहराला पुराचा धोका लक्षात घेता वाशिष्ठी व शिवनदीच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधण्याच्या दृष्टीने चिपळूण नगर परिषदेच्या सभेत ठराव करण्यात आला आहे. ठराव मेरिटाईम बोर्डाकडे देण्यात आले असल्याचे सांगून या कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली. यासाठी हजारो कोटींच्या निधीची आवश्यकता असून केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाईल. असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले असल्याची माहिती पत्रकारांना दिली. तसेच गाळ काढण्यासाठी १२०. कोटीं तसेच चिपळूण शहराच्या ग्रॅव्हिटी नळ पाणी योजनेसाठी १३५ कोटी रुपयांची निधीची मागणी केली असल्याचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी यावेळी सांगितले.

चिपळूण शहराच्या विकासाच्या दृष्टीने चर्चा करीत असताना आपल्या प्रभागातील विकास कामांसाठी देखील निधी मिळावा अशी मागणी केली. यामध्ये ५० लाख रुपयांची कामे सुचवण्यात आले असल्याचे माहिती दिली. या कामांना लवकरच मंजुरी दिली जाईल असे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सुधीर शिंदे यांना ग्वाही दिली आहे. राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याशी चिपळूण शहराच्या कामासंदर्भात झालेली चर्चा सकारात्मक असून आपण समाधानी असल्याचे सुधीर शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular