26.5 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriसंतापलेल्या लेकाने डोक्यात लाकडी दांडा घालून केला बापाचा खून

संतापलेल्या लेकाने डोक्यात लाकडी दांडा घालून केला बापाचा खून

घरगुती कारणावरून झालेल्या बाप बेट्याच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू.

घरगुती कारणावरुन बाप-बेट्यामध्ये हाणामारी झाली. ही हाणामारी टिपेला जाऊन मुलानेच बापाला गारद केले. लाकडी दांडा बापाच्या डोक्यात घालून बापाचाच खून केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री ९.३० वा. च्या सुमारास वरची निवेंडी समतानगर येथे घडला. रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी समतानगर येथे गुरूवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरगुती कारणावरून झालेल्या बाप बेट्याच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरेश नावजी कदम (वय वर्षे ५८) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राजेश सुरेश कदम वर्षे ३८ असे मारहाण केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली.

घरगुती वाद – पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार वरची निवेंडी समतानगर येथे सुरेश नावजी कदम हे आपला मुलगा राजेश व मुलगी सुषमा असे एकत्रित राहत होते. परंतु गुरुवारी रात्री घरगुती कारणावरून दोन्ही बाप बेट्यांमध्ये भांडण झाले. बाप- बेटे एकमेकाला भिडल्याने दोघांमध्ये हाणामारी झाली.

डोक्यात लाकडी दांडा घातला – बाप-बेट्यामध्ये झालेली हाणाम री विकोपाला गेली आणि मुलाचा पारा अधिकच चढला होता. रागाच्या भरात राजेश याने आपल्या वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मोठा प्रहार केल्याने ते जागीच कोसळले.

बेशुद्ध पडले – वडीलांनी मुलाच्या कौटुंबिक वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्याचवेळी मुलाने बापाच्या डोक्यात लाकडी दांडा घालताच सुरेश हे जमिनीवर कोसळले. त्यानंतर ते उठत नसल्याने राजेश याने आपला चुलत भाऊ विनेश कदम याला घरी बोलावून आणले. त्यावेळी विनेश कदम यांनी पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले.

रुग्णालयात हलविले – याविषयीची तात्काळ खबर त्यांनी निवेंडी गावचे पोलीस पाटील दिवाकर कदम यांना दिली. त्यानंतर पोलीस पाटील दिवाकर कदम यांनी सरकारी रुग्णवाहिकेला बोलावून घेतली व निपचित पडलेल्या सुरेश कदम यांन तात्काळ खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

मृत घोषित – यावेळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले. याविषयीची खबर निवेंडीचे पोलीस पाटील दिवाकर कदम यांनी जयगड पोलीस ठाण्याला दिल्यानंतर तात्काळ जयगड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेल्या मालगुंड- गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित घटनेचा पंचनामा केला.

गुन्हा दाखल – या प्रकरणात जयगड पोलिसांनी बापाचा खून केल्या प्रकरणी मुलगा राजेश याच्याविरुद्ध भा. दं. वि. कं. ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला रात्री उशीरा जयगड पोलिसांनी अटक केली. त्याचा पुढील तपास पी. एस. आय. क्रांती पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular