महाराष्ट्रामध्ये भाजपची ११ पक्षांशी महायुती आहे. लोकसभा निवडणुकीत आमची महायुती ४५ जागा जिंकेल रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभा भाजप महायुतीचा उमेदवार विजयी होणार आहे. आज ६०० प्रमुख वॉरियर्सची बैठक घेतली. ते १९ डिसेंबरपर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ६० हजार घरांत पोहोचणार आहेत व संपर्क करून समर्थन मागणार आहेत. महायुतीत ज्याला जागा मिळेल तो निवडून येण्यासाठी भाजपचा आमचा वॉरियर्स मदत करणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. महाविजय २०२४ संकल्प दीयाअंतर्गत रत्नागिरीत भाजपने शक्तिप्रदर्शन करत मोदींसाठी रत्नागिरीकरांची मते मागितली.
बावनकुळे म्हणाले, “मोदींच्या नेतृत्वाखाली गरीब, मध्यमवर्गीयांच्या योजना, विश्वकर्मा योजना, अन्नसुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. मोदींनी जगातला १ नंबरचा देश करण्याच्यादृष्टीने नवभारताची रचना केली आहे. मी महाविजयअंतर्गत ३२ हजार लोकांना भेटलो. त्यात केवळ १३ जण वगळता सर्वांनी मोदी पंतप्रधान व्हावेत, असे सांगितले. महाराष्ट्रातील ९० टक्के जनता मोदींना समर्थन देते. बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्रात बॉंबस्फोट झाले. अनेक दहशतवादी कृत्येही झाली. दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जग उभं झालं आहे. मोदी दहशतवादाविरुद्ध उभे ठाकले आहेत आणि शरद पवार मोदी यांच्यावर टीका करत आहेत. पवारानी मोदींवर केलेल्या टीकेचा निषेध करतो.”