26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriरत्नागिरीच्या सुपुत्राने राजेशाही थाटामाटाचे हॉटेल उभारले याचा अभिमान : अण्णा सामंत

रत्नागिरीच्या सुपुत्राने राजेशाही थाटामाटाचे हॉटेल उभारले याचा अभिमान : अण्णा सामंत

सावंत पॅलेस हॉटेलचे उदघाटन उद्योजक अण्णा सामंत यांच्याहस्ते झाले.

‘रत्नागिरीत इतके देखणे हॉटेल उभारणे हे धाडस आहे आणि ते रत्नागिरीच्या एका सुपुत्राने केल्याचा मला सार्थ अभिमान आहे. हॉटेलचे व्यवस्थापन आणि देखणे रुप पाहून लोक आपोआपच सावंत ‘पॅलेस हॉटेलकडे येतील’ असा विश्वास जेष्ठ उद्योजक रवींद्र उर्फ आण्णा सामंत यांनी येथे व्यक्त केला. रत्नागिरीतील टी.आर.पी. परिसरात रत्नागिरी येथील उद्योजक शकिल सावंत यांनी उभारलेल्या सावंत पॅलेस हॉटेलचे उदघाटन उद्योजक अण्णा सामंत यांच्याहस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका सौ. उर्मिलाताई घोसाळकर, कोकणातील जेष्ठ उद्योजक नजीरशेठ नाईक सौ. स्वरूपा सामंत, आर. के. केबल्सचे संचालक रज्ज्जाक काझी, सौ. फरिजा काझी, जेष्ठ नेते आणि भूतपुर्व उपनगराध्यक्ष राजन शेट्ये युवा उद्योजक विराज घोसाळकर, सौ. राजवर्धीनी घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वप्न साकारले उद्घाटनानंतर सावंत पॅलेसचे मालक बोलताना शकील सावंत यांनी सांगितले की, “आजचा दिवस माझ्यादृष्टीने महत्त्वाचा आणि भाग्याचा दिवस आहे. ४० वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न आज साकारले आहे’ अनेक अडचणी आल्या मात्र त्यावर मात करून हे स्वप्न साकारले आहे. रत्नागिरीकरांच्या आणि पर्यटकांच्या पसंतीस हे हॉटेल उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिकांच्या सहकार्यातूनच हे हॉटेल उभारल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरीची शान – यावेळी दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. हॉटेलचे स्वरुप आणि सौदर्य पाहून आपण दुबईत असल्याची जाणीव होते. येत्या काही काळातच परदेशी पर्यटकदेखिल या हॉटेलमध्ये वास्तव्याला येतील आणि त्यांच्या आदरातिथ्यात हॉटेल सावंत पॅलेस कोठेही कमी पडणार नाही. हे हॉटेल रत्नागिरीची शान ठरेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शकिल सावंत यांना शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांचा सत्कार – हॉटेलचे मालक शकिल सावंत यांच्याहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हॉटेलच्या उभारणीत ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचाही सत्कार अण्णा सामंत, सौ. स्वरुपा सामंत यांच्याहस्ते करण्यात आला. प्रमुख पाहूणे अण्णा सामंत यांचा शकिल सावंत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

संगित मैफिलिचे आयोजन – या हॉटेलच्या शुभारंभांच्या निमित्ताने खास संगित मैफिलिचे आयोजन करण्यात आले होते. शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची रांग लागली होती. सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांमध्ये आमदार शेखर निकम माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, जेष्ठ नेते बशिर मुर्तझा, बिपिन बंदरकर, दिपक पवार यांच्यासह अनेकांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक जेष्ठ पत्रकार अलिमियाँ काझी यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular