22.1 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRatnagiriजिल्ह्यात शेतीमालावर आधारित प्रकल्प, स्मार्ट प्रकल्पा'त १३ कंपन्यांची नोंदणी

जिल्ह्यात शेतीमालावर आधारित प्रकल्प, स्मार्ट प्रकल्पा’त १३ कंपन्यांची नोंदणी

परिणाम ग्राहकांच्या मानसिकतेवर होतो आणि उत्पादनांच्या बाजारातील विक्रीवर होताना दिसतो.

शेतमालाची विक्री अथवा प्रकिया उत्पन्नांना योग्य बाजारपेठ मिळावी, गावातील समान शेतमालाला एकाच छताखाली साठवणूक, पॅकिंग, प्रक्रिया, मार्केटिंग करता यावे, यासाठी स्मार्ट प्रकल्प राबवला जात आहे. ग्रामीण जीवनोन्नती अर्थात ‘उमेद’च्या महिला स्मार्ट प्रकल्पातून शेतीमालावर आधारित कंपनी स्थापन करत आहेत. जिल्ह्यात सध्या १३ कंपन्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सांगण्यात आली. जिल्ह्यातील आंबा, काजू, कोकम, करवंद, आवळा, हळद, भात, नाचणी, कुळिथ अशी कितीतरी फळपिके आणि शेती उत्पादने घेतली जातात. अनेक उत्पादनांवर प्रकिया करून त्यांचे मूल्यवर्धन केले जाते. या सर्व उत्पादनांना योग्य बाजारपेठ, संघटन नसल्याने उत्पादनांचे दर, त्यांची विक्री, पत अशा सर्वच गोष्टीत तफावत पाहायला मिळते.

याचा परिणाम ग्राहकांच्या मानसिकतेवर होतो आणि उत्पादनांच्या बाजारातील विक्रीवर होताना दिसतो. जर हीच उत्पादने एका कंपनीमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचवली गेली तर गावागावातील शेतमालाला योग्य किंमत मिळण्यास मदत होऊ शकते. शेती अथवा फळपिकांवर प्रकिया करणे प्रत्येक शेतकऱ्याला अथवा बागायतदाराला परवडतेच असे नाही. या वेळी गावात तयार झालेल्या या कंपनीमार्फत शेतकरी आपल्या शेतीमालावर प्रकिया करून मूल्यवर्धात नफा मिळवू शकतो. त्यामुळे शासनाच्या या स्मार्ट प्रकल्पाचा लाभ घेत जिल्ह्यात १५ कंपन्या निर्माण करण्यात आल्या आहेत. शेतमालावर गावातच प्रक्रिया होण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामपरिवर्तन प्रकल्पाची (स्मार्ट) अंमलबजावणी केली आहे.

 या प्रकल्पांतर्गत राज्यात क्लस्टर बेस संस्थांना १३२२ उद्योग उभारणीचे उद्दिष्ट आहे. त्यातील ११९१ प्रकल्पांना प्राथमिक मान्यता मिळाली असून, ५७३ संस्थांचेच प्रकल्प अहवाल अंतिम करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांमध्ये समूहस्तरावर मूल्यवर्धनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. प्रकल्पातून उद्योग उभारणीसाठी प्रकल्प किंमतीच्या सरासरी ६० टक्के अनुदान देण्याची तरतूद केली. शेतकरी कंपन्या, बहुद्देशीय संस्था तसेच महिला समुहांना या प्रकल्पात समावेशित करून घेण्यात आले आहे. संस्था व स्वयंसाहाय्यता समुहांचे रूपांतर शेतकरी कंपन्यांमध्ये रूपांतरणाची अट घालण्यात आली होती. त्यानंतरच्या त्यांच्या प्रकल्प आराखड्याला मान्यता दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular