26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunतर पवारांना एक मतदारसंघ द्यावा लागेल - आमदार भास्कर जाधव

तर पवारांना एक मतदारसंघ द्यावा लागेल – आमदार भास्कर जाधव

रत्नागिरीत एका कार्यक्रमासाठी आलेल्या आमदार जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मतदारसंघाचा यापूर्वी आमदार होतो त्यामुळे या मतदारसंघाबाबत प्रेम आहे. या ठिकाणी उभे राहण्यास इच्छुक आहे; परंतु चिपळूणचा मतदारसंघ मी मागितला, तर पवारसाहेबांना आणखी एक मतदारसंघ द्यावा लागेल, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगत ते चिपळुणात लढायला तयार असल्याचे सूतोवाच केले. रत्नागिरीत एका कार्यक्रमासाठी आलेल्या आमदार जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली; परंतु दिल्लीच्या वेशीवर १३ महिने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ७८० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी काय केले, हे विचारण्याचा अधिकारच नाही. भारताने शेती क्षेत्रामध्ये निर्यातदार म्हणून जो आपला दबदबा निर्माण केला आहे हे पवार साहेबांचे कर्तृत्व आहे. ‘कॅग’ ही संस्था १९४८ मध्ये स्थापन झाली; परंतु या संस्थेने सरकारचेच घोटाळे बाहेर काढल्याने ही संस्था बंद करण्याची भूमिका मोदी सरकारनेच घेतली. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना छक्केपंजे माहीत नाहीत. ते होते म्हणून कोरोना काळात महाराष्ट्र कठीण परिस्थितीमधून बाहेर आला.

केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भाषणे खुसखुशीत असतात. आपण ही रंगतदार भाषणे ऐकत मुंबई – चिपळूण मार्गावर प्रवास सुरू करतो; मात्र गडकरी साहेबांचा आदर करतो, असा टोला जाधव यांनी मारला. शिवसेना आमदार सुनावणीबाबत ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांकडून न्याय मिळेल, याची आपल्याला काडीमात्र आशा नाही.

RELATED ARTICLES

Most Popular