26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriविकासकामांसाठी निधी देण्यास सुरुवात केल्याने शिवसैनिकांचा ओढा सामंतांकडे

विकासकामांसाठी निधी देण्यास सुरुवात केल्याने शिवसैनिकांचा ओढा सामंतांकडे

लांजा प्रमाणेच राजापूर तालुक्यातही मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरु केली आहेत.

लांजा- राजापूर विधानसभा मतदार संघात पालकमंत्री उदय सामंत यांनी विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी देण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक शिवसैनिकांचा ओढा सामंतांकडे वाढला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांच्या बैठका आता रत्नागिरीत ‘झडू लागल्या आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीसह जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक प्रकल्प नव्याने सुरु केले आहेत. रत्नागिरीसह शेजारच्याच लांजा-राजापूर-साखरपा मतदार संघातही मोठ्याप्रमणात विकास कामांचा निधी देण्यास पालकमंत्री यांनी सुरुवात केली आहे.

त्यामुळे लांजा नगरपंचायतीमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेगटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. नगरपंचायतीसह आता लांजा ग्रामीण भागातही ना. सामंत यांनी लक्ष दिले आहे. लांजा प्रमाणेच राजापूर तालुक्यातही मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरु केली आहेत. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन विकास कामे होत असल्याने, ना. सामंतांना मानणारा वर्ग त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात तयार झाला आहे. नवरात्रोत्सवात ना. सामंत यांनी नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दाखवून दिले आहे.

याचवेळी सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांची कन्या अपूर्वा हिने लांजा तालुक्यातील काही नवरात्रोत्सवाला भेट देत, युवा सेना वाढवण्यासाठी येथील तरुणाईला बळ देण्याचा प्रयत्न केला. यामुळेच आता लांजा-राजापूरमधील ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात आता रत्नागिरीत बैठका झडू लागल्या आहेत. ङ्गना. सामंतांकडून होणारी विकास कामे आणि विकास कामे घेण्यावरुनही ठाकरे गटाचे नेते मंडळी आपली नाराजी व्यक्त करु लागली आहेत. या अस्वस्थ राजकारणाच्या चर्चा आता रत्नागिरीत जडू लागल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular