लॉकडाऊन काळामध्ये वेळ असून, काहीही नवीन करता येत नाही अशी सद्य स्थिती आहे. कोरोनाच्या कालखंडामध्ये सर्व क्षेत्र कमी-अधिक प्रमाणात नुकासानीमध्ये आहेत. त्यामध्ये ग्रंथालय आणि त्याचा कारभार फार मोठ्या प्रमाणावर अडचणीत आली आहे. मागील वर्षीपासून सुरु झालेल्या लॉकडाउनच्या कालखंडामध्ये ग्रंथालय पूर्णपणे बंद आहेत. कोरोनाचे नियम काही प्रमाणात शिथिल होऊन इतर सर्व व्यवहार सुरू होऊन देखील, अद्याप वाचनालये सुरू करण्यासाठी प्रशासनाचे आदेश प्राप्त झाले नाहीत.
रत्नागिरीमधील वाचनालये बंद असल्यामुळे वाचकांना त्यांच्या आवडत्या पुस्तकांपासून दूर राहावे लागत आहे. नियमित पुस्तके वाचणाऱ्या वाचकांची बौद्धिक चालना देणारी पुस्तके लॉकडाउन मुळे वाचनालय बंद असल्याने मिळणे दुरपास्त झाले आहे. ग्रंथालयांमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी हे यांच्या तुटपुंज्या मानधनावर अवलंबून आपला उदरनिर्वाह करतात. सध्याच्या घडीला मात्र वाचनालय बंद असल्याने व वाचनालयांचे उत्पन्न पूर्ण ठप्प झाल्याने, वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ग्रंथालयाबद्दलची उदासीनता झटकून वाचनालये सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
वाचनालयामध्ये पुस्तकांची वेळोवेळी देखभाल करणे फार महत्वाचे आहे. वाचनालय बंद असली तरी वाचनालयातील ग्रंथांची योग्य देखभाल सातत्याने करावी लागत आली आहे. पुस्तके पुसून नीट ठेवणे, वाचनालायातील मधील ग्रंथ ठेवलेल्या जागेमध्ये हवा खेळती राहील की ज्यामुळे बाष्प धरणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना सातत्याने करणे आवश्यक असते. वाचनालय संपूर्ण बंद असल्यामुळे पुस्तकांच्या देखभालीकडे लक्ष देणे अशक्य झाले असून, त्यामुळे विविध प्रकारचे ग्रंथ पावसाळ्यात वाळवी, किंवा इतर काही प्रकारे खराब होऊ शकतात अशी स्थिती उद्भवली आहे.
वाचनालयाचे वर्गणी तसेच अन्य उत्पन्न सद्यस्थितीत बंद आहे. शासनाने गतवर्षीची तसेच चालू वर्षातील अनुदाने वाचनालयाना अद्यापही दिलेली नाही. त्यामुळे वाचनालयाचे नियमित खर्च पगार, लाईट बिल, पाणी बिल, मेन्टेनन्स हे अव्याहतपणे सुरू आहेत.