24.9 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriअप्पर पोलिस अधीक्षकांच्या दालनाला आग

अप्पर पोलिस अधीक्षकांच्या दालनाला आग

एका कर्मचाऱ्याने सतर्कता दाखवत वीजपुरवठा खंडित केला.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या दालनामध्ये अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला. आज दुपारी ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत विद्युतपुरवठा खंडित केला. फायर फायटरने या आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत आग अटोक्यात आली होती. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड दुपारी निवासस्थानी होत्या. कर्मचारीही जेवण करण्यासाठी बसलेले होते. त्या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक दालनातून धूर बाहेर येऊ लागला. दालनातील धूर मोठ्या प्रमाणात अधीक्षक कार्यालयाच्या आवारात पसरल्यामुळे कुठेतरी आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

सर्वच कर्मचाऱ्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या दालनाच्या दिशेने धाव घेतली. या वेळी दालनाला लागून असलेल्या खोलीत शॉर्टसर्किट होऊन इलेक्ट्रिक वायर पेटल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यातील एका कर्मचाऱ्याने सतर्कता दाखवत वीजपुरवठा खंडित केला. फायर फायटर सिलिंडरच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. याच कालावधीत काही कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. ते पथक तत्काळ दाखल झाले; मात्र आग आटोक्यात आली होती. या घटनेची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना देण्यात आली. त्यांनीही पाहणी केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकामच्या विद्युत विभागाचे अभियंता, महावितरणचे कार्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular